दि. १७,१८ व १९ऑगस्ट रोजी सायं. ६.०० ते ७.०० यावेळेत लाईव्ह होणार आहे.
पंढरपूर, प्रतिनिधी
मा. आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचा प्रथम स्मृतिदिन दि.१७ऑगस्ट रोजी आहे. या निमित्त कर्मयोगी इंजिनिअरींग व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आभासी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेला अध्यक्ष या नात्याने जिल्ह्याचे आमदार मा. श्री प्रशांत (मालक) परिचारक व प्रमुख उपस्तीथी मा. श्री रोहन परिचारक यांची असणार आहे.
सदर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि. १७ऑगस्ट रोजी मा. आ. श्री लक्ष्मणराव ढोबळे सर हे “मालकांचा कर्मयोग” या विषयावर गुंफणार आहेत, तर दुसरे पुष्प दि.१८ऑगस्ट रोजी ह. भ. प. श्री विवेकजी घळसासी हे “युवक : समाज आणि संस्कृती” या विषयावर गुंफणार आहेत आणि तिसरे व शेवटचे पुष्प ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर हे “कर्मातील ज्ञानयोग” या विषयावर गुंफणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील यांनी दिली. कर्मयोगी व्याख्यानमाला ही मोठ्या मालकांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणार असून दरवर्षी व्याख्यानमाला ही एका थीमवरती आधारित असेल. या वर्षीची व्याख्यानमाला 'स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे सामाजिक जीवन' या थीमवर आधारित आहे अशी माहिती कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए.बी.कणसे यांनी दिली. कर्मयोगी व्याख्यानमाला ही
Youtube(https://www.youtube.com/c/KarmyogiEngineering)
आणि
Facebook (https.//www.facebook.com/kecsp)
या वेबसाइट लिंकवरती दि. १७,१८ व १९ऑगस्ट रोजी सायं. ६.०० ते ७.०० यावेळेत लाईव्ह होणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा