maharashtra day, workers day, shivshahi news,

जनकल्याण रक्तपेढीने कोव्हिडंच्या काळात रक्तदान व प्लाझ्मा योग्य पुरवठा करून केली जनसेवा - सत्यशोधक रघुनाथ ढोक

75 व्या स्वातंत्र्य दिनी 77 जणांनी केले रक्तदान

jankalyan blood bank, pune , blood donation, shivshahi news
75 व्या स्वातंत्र्य दिनी 77 जणांनी केले रक्तदान


पुणे- प्रतिनिधी 

भारत विकास परिषद स्वारगेट शाखा व सौ सुशिलाबेन मोतीलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर यावर्षी देखील भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.१५/०८/२०२१ रोजी जनकल्याण रक्त पेढी,पुणे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत आयोजित केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण चे डॉ.अतुल कुलकर्णी, राजेंद्र लुंकड, माजी.ACP. माधव चिरमे, पृथ्वीराज धोखा,रतन माळी, प्रकाश सोळंकी, गोरख थोरात,विठ्ठल काटे,रेखा आखाडे ,कोकिळाबेन शेठ,वासुदेव केंच ,दीपक गुदेचा उपस्थित होते.

मान्यवरांचे शुभहस्ते भारतमातेचे पुजन

यावेळी जनकल्याण रक्तपेढी ला आधुनिक काळानुरूप रक्त, लघवी, थुंकी, तपासणी यंत्र मधुकर गिरमे व मोतीलाल शाह तर्फे भेट देण्यात आले.यावेळी या मशीनची उपयुक्तता व रक्तदानाची सध्या किती गरज आहे या विषयी मौलिक माहिती डॉ.अतुल कुलकर्णी यांनी देऊन गावोगावी जाऊन शिबिर घेण्यासाठी दानशूर व्यक्तीची गरज आहे असे देखील म्हंटले.

 यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की कोव्हिडं च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जनकल्याण रक्तपेढी ने जनसेवा म्हणून अल्प किमतीत लोकांना मुबलक रक्तपुरवठा तसेच प्लाझ्मा उपलब्ध करून चांगली सेवा दिली .याबद्दल जनकल्याण रक्तपेढीचे अभिनंदन करून ढोक पुढे म्हणाले की आजही आपल्या भारताला रक्तदान करणारे तरुण पिढीची जास्त गरज आहे त्यासाठी गोवोगावी जनजागृती होणे गरजेचे आहे.

 याप्रसंगी तरुण पिढीतील ऋतुजा औटी,वैभव गायकवाड, निखिल कदम यांनी प्रथमच रक्तदान केले तर नेहमी प्रमाणे सत्यशोधक रघुनाथ ढोक , युवराज सांवत व महात्मा फुले विध्यानिकेतन संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून 77 रक्तदात्यांनी श्रेष्ठ दान म्हणून रक्तदान केले.या सर्वांना गौरव पत्र ,मास्क,पेन व फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनतर्फे रक्तदाते व जनकल्याण रक्तपेढीच्या महिला कर्मचारी यांना महात्मा फुले गीत चरीत्र व थोर ऐतिहासिक शूर महिला ग्रंथ भेट दिले तर मोतीलाल शाह यांनी रतन माळी यांच्या घरटे प्रकल्पाला 5 हजार रुपयांचा धनादेश सौ.सुशिलाबेन शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिले. आणि फुले एज्युकेशनला त्यांनी साउंड सिस्टीम भेट दिली.यावेळी सुशीलबेन शाह आणि कोकिळाबेन शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त व सामाजिक कार्याबद्दल त्यांचा भारत विकास परिषद ,स्वारगेट तर्फे पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत विकास परिषदेचे चंद्रकात दर्डा,,श्रेणीक शाह,आकाश ढोक, सुनील शाह ,नाथाभाऊ माळी,अमित शेठीया ,जनकल्याण चे संतोष अंगुळकर,स्वाती एडके व सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक अतुल सलागरे सूत्रसंचालन शैलेश शाह व आभार मनोज शाह यांनी मानले.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !