महसूल दिनानिमित्त फुलचिंचोली येथे आशा स्वयंसेविका साठी जलनेती शुद्धिक्रिया अभियानाचे आयोजन
![]() |
jalneti camp |
योग विद्या धाम पंढरपूर व तलाठी कार्यालय फुलचिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने फुलचिंचोली येथे प्राचार्य अशोक ननवरे सर व तहसीलदार सुशील बेल्हेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेवीका,ग्रामपंचायत कर्मचारी,कोतवाल यांचेसाठी जलनेती अभियानांतर्गत जलनेती शुद्धीक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी फुलचिंचोलीचे सरपंच नारायण जाधव, ग्रामसेवक विकास सुरवसे, योगशिक्षक तलाठी विजया नाईक मॅडम,ग्रा.पं.सदस्य प्रक्षाळे उपस्थित होते .यावेळी फुलचिंचोलीच्या तलाठी योगशिक्षिका नाईक मॅडम यांनी आजच्या या कोरोना संसर्गाच्या काळात covid-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त अशा जलनेती या योगशास्त्रातील नासिकामार्गाच्या शुद्धिक्रियेची माहिती दिली .
![]() |
jalneti camp |
जलनेती शुद्धीक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले .उपस्थित आशा स्वयंसेविकांकडून जलनेती शुद्धिक्रिया करून घेतली .यावेळी पारस उद्योग समूह अहमदनगर यांच्या सौजन्याने जलनेती पात्राचे प्रशिक्षणार्थींना वाटप करण्यात आले.
![]() |
jalneti camp |
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा