![]() |
ना.रामदास आठवले व ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव स्विकारताना महेश खिस्ते |
पत्रकारीतेतून समाजासाठी योगदान दिल्याबध्दल श्री महेश खिस्ते सन्मानित
मुंबईत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ना.रामदास आठवले व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य व दिमाखदार सोहळ्यात 'सन्मान देवदूतांचा' या शिर्षकाखाली माान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सांगलीचे राजे विजयसिंह पटवर्धन, दै.पुढारीचे मुंबई आवृत्ती प्रमुख विवेक गिरीधारी,आयबीएन लोकमत न्युज चॅनेलचे प्रमुख आशुतोष पाटील, संकल्प प्रतिष्ठानचे डॉ.एन पी कदम कार्यक्रमाचे आयोजक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे, निमंत्रक किरण जोशी,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ् अनिल पाटील, हे मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत काम केलेल्या व कायमच समाजासाठी झटणार्या विशेष कार्य केलेल्या महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील नामांकित मान्यवरांचा समावेश या पुरस्कारात केला होता. या कार्यक्रमात पत्रकारीतेतून समाजासाठी योगदान देणार्या महाराष्ट्रातील प्रमुख पत्रकारांचा विशेष गौरव करण्यात आला. गेली 30 वर्षापासून राज्यातील विविध मान्यवर दैनिकातून लेखन करणार्या व सध्या दै.तरुण भारत सोलापूरचे उपसंपादक म्हणून कार्यरत असणारे महेश खिस्ते यांचा केंद्रीय समाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले,माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे व मान्यवरांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत समाजासाठी झटणार्या व्यक्तीच्या सत्कारा बाबत त्यांना शुभेच्छा दिल्या
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा