सरकारी नियमांचे पालन करत घेतले फक्त नामदेव पायरीचे दर्शन
![]() |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी स्नेहल हिची पंढरीला भेट |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाहीसे केले व्हि.आय.पी. कल्चर
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून भारतातील व्हीव्हीआयपी संस्कृती नष्ट होवु लागल्याची चर्चा आपण कायम ऐकत असतो. पंतप्रधान असतानाही कायम साध्या राहणीसाठी नरेंद्र मोदी प्रसिध्द आहेत. त्यांचे कोणीही नातेवाईक राजकारणात नाहीत, की त्यांच्या पदाचा फायदा त्यांचे बंधु अथवा घरातील अन्य लोंकांनी अजिबात घेतला नसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. यालाच पुष्टी देणारी घटना तिर्थक्षेत्र पंढरीत घडली असून, जगातील शक्तीशाली पंतप्रधान म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते, त्या नरेंद्र मोदी यांची सख्खी पुतणी पंढरपूरला आली, मात्र कोरोना व संचारबंदी मुळे, श्रीविठठ्लाचे मंदिर बंद असल्याचे समजल्या नंतर तिने चक्क नामदेव पायरीचे दर्शन घेवून परत जाणे पसंद केले. तिने आपल्या दौर्याची कल्पना कोणत्याही शासकीय अधिकार्याला अगर पक्षाच्या पदाधिकार्यांना सुध्दा दिली नाही.
सर्व नेत्यांनी हा आदर्श घ्यायला हवा एरव्ही नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य असलेल्या व्यक्तीच्या घरातील लोकांच्या सुद्धा अपेक्षा वाढतात. आपल्याला विनारांग वशिल्याने सर्व मिळावे, अशी अपेक्षा ही मंडळी करतात. मग मंत्री, आमदार, खासदार यांचा थाट तर काही औरच असतो. ते स्वता तर व्हीव्हीआयपी सुविधा घेतातच, परंतु आपले नातेवाईक कुटुंबीय व मित्रमंडळी, ऐवढेच नव्हे तर मंत्र्यांच्या शिपायाचा व ड्रायव्हरचा थाट सुध्दा काही औरच असतो. याचा प्रत्यय पंढरपूरात रोजच येतो. श्रीविठठ्लाचे थेट दर्शन मिळावे म्हणून अधिकार्यांच्या व पुढार्यांच्या मागे लागलेले व्हीआयपींचे अनेक मित्र, नातेवाईक पंढरपूरात रोज हजारोने बघायला मिळतात.
सामान्य जीवन जगतात मोदींचे भाऊ आणि नातेवाईक
यालाच छेद देणारी वागणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. केवळ त्याचीच नव्हे तर त्यांचे बंधु, प्रल्हाद दामोदरदास मोदी, हे एक साधे रेशन दुकानदार असून, ते आता रेशनदुकानदार संघटनेचे पदाधिकारी आहेत. तसेच कार्यकत्यार्ंच्या आग्रहाखातर व बंधु नरेंद्र मोदी यांचे कार्य जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना, पंतप्रधान जनकल्याण प्रसार प्रचार अभियानाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. प्रल्हाद मोदी हे सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांची मुलगी कुमारी सोनल ही देखिल त्यांच्या सोबत आली होती. पंढरपूर तिर्थक्षेत्रा बाबतची महती, नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यामांवर व्यक्त केली असल्याने, तिने पंढरपूरला भेट देण्याची ईच्छा प्रदर्शित केली. त्याप्रमाणे प्रल्हाद मोदी हे माळशिरस येथेच थांबले. मात्र सोनल ही पंढरपूरला आली.
![]() |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी स्नेहल हिने नामदेव पायरीचे दर्शन घेतले |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीने केले सरकारी नियमांचे पालन
पंढरपूरला कोरोना मुळे, श्रीविठट्लाचे मंदिर बंद असल्याचे, व संचारबंदी असल्याचे समजल्या नंतर, तिने शासकीय नियमांचे पालन करीत, केवळ नामदेव पायरीचे दर्शन घेतले. हे समजताच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठठ्ल जोशी यांनी, तिथे येवुन त्यांचा सत्कार केला.
![]() |
नरेंद्र मोदींच्या पुतणीने घेतली परिचारक कुटुंबाची भेट |
स्व. सुधाकर पंत परिचारक कुटुंबाची भेट घेतली
तसेच पंढरपूरातील रुषीतुल्य जेष्ठ नेते स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या बाबत तिला माहिती कळताच, तिने परिचारक यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे जेष्ठ बंधु, अॅड.प्रभाकरपंत परिचारक, यांनी तिचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, भाजपा गटनेते अनिल अभंगराव, व समाजिक कार्यकर्ते अमोल नागटिळक उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा