पंढरपूर वृत्तपत्र लेखक संघातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
पंढरपूर ( प्रातिनिधी ) -
पंढरपूर तालुका वृत्तपत्र लेखक संघटने तर्फे पुनर्वसन गावठाण इसबावी पंढरपूर येथे झाडे लावा झाडे जगवा अर्थात वृक्षारोपण हा उपक्रम राबवण्यात आला. चंद्रेश्र्वर व साईभक्त मंडळ ट्रस्ट यांच्या महादेव मंदिर परिसरात वड, पिंपळ अशी ओक्सिजनचा स्रोत असणारी रोपे लावली. कोरॉना काळात ऑक्सीजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले, म्हणून हा उपक्रम पंढरपूर वृत्तपत्र लेखक संघातर्फे अविरतपणे राबविण्यात येणार आहे.
याप्रसंगी संघटनेच्या अध्यक्षा सौ शोभा माळवे उपाध्यक्ष सुहास हरिदास, अशोक कोर्टीकर, राजू भाई मुलाणी, धनंजय नाईकनवरे, सीमा अवसेकर, रविराज सोनार, अंध शाळेचे नितीन कटप, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक श्री गणेश भाऊ अधटराव व परिसरातील महिला यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटक मलप्पा माशाळे यांनी परिश्रम घेतले. ट्रस्ट चे पदाधिकारी व युवक प्रतिनिधी सागर पडगल यांनी पुनर्वसन गावठाण समस्या पत्र लेखकांनी वृत्तपत्रातून मांडाव्यात अशी विनंती केली
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा