व्यापार्यांचे लसीकरण करुन त्यांना व्यापार करण्याची परवानगी दिली पाहीजे
पंढरपूर - दिनांक २६ ( प्रतिनिधी )
ज्यांना लस दिली आहे अशा वारकर्यांना पंढरपूरात येवु दिले पाहिजे तसेच पंढरीतील सर्व व्यापार्यांचे लसीकरण करुन त्यांना व्यापार करण्याची परवानगी दिली पाहीजे. सर्वाचे सर्व चालु आहे मात्र व्यापार्यांचे सर्व बंद पडले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरीकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारचे सात हजार कोटी रुपये वाचले असून यामधून छोटे मोठे व्यापारी व यात्रावर जगणार्या दुकानदारांना शासनाने मदत थेट केली पाहीजे अशी मागणी आ. प्रशांतराव परिचारक यांनी पत्रकारांशी बोलताना केली. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा मुळे ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळणारे राजकीय आरक्षण रद् झाल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने रास्ता रोका करण्यात आले या प्रसंगी उपस्थित आ.प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांनी या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला.
या प्रसंगी बोलताना आ.समाधान आवताडे म्हणाले कोरोनाच्या काळात तिरुपती बालाजी मंदिरासह अनेक मंदिरे नियमाचे पालन करीत भाविकांना खुली करण्यात आली आहेत मात्र पंढरपूरात आषाढी वारीच्या काळात संचारबंदी लागु करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून हा निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना सुध्दा विश्वासात घेतले गेले नाही असा आरोपआवताडे यांनी केला.
आ. आवताडे पुढे म्हणाले आषाढीच्या काळात संचारबंदी लागु केल्याने पंढरपूरातील व्यापारी व नागरीकांवर अन्याय होणार असून लॉकडाउन मुळे व्यापारी प्रचंड अस्वस्थ असून गडीपगार लाईट बिले भरणे सुध्दा अशक्य झाले आहे. या बाबत दाद मागायची म्हटले तरी विधानसभेची दारे बंद आहेत आपण व आ.प्रशांत परिचारक या बाबत जिल्हाधिकार्यानां भेटून व्यापरी व नागरीकांच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहोत.असे आ. आवताडे यांनी याप्रसंगी सांगितले.
पंढरपुरातील कर्मवीर भाउराव पाटील महाविदयालया समोरील क्रांतिसिह नाना पाटील चौकात झालेल्या रास्ता रोको प्रसंगी दोन आमदारांसह नगराध्यक्षा साधना भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पांडुरंगचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, उपसभापती राजश्रीताई भोसले, नगरसेवक अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी, तम्मा घोडके प्रा.सुभाष मस्के, माउली हळणवर यांच्या सह वडार, गोधळी, कासार, शिंपी, लिंगायत, माळी कोळी, घडशी, नाभिक आदी ओबीसी समाजाचे अनेक नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.आपल्या अभ्यासपुर्ण भाषणातून आ.परिचारक यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच आबीसींचे आरक्षण रद् झाले असल्याचे सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा