विज्ञान व अध्यात्म एकञ आल्यास मानवतेचा विकास शक्य : - डॉ. विजय भटकर
![]() |
International Research Council |
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद उत्साहात संपन्न
पंढरपूर - प्रतिनिधीविज्ञान आणि अध्यात्म यांचा एकत्रित प्रवास म्हणजे पुर्ण ज्ञान. पुर्ण ज्ञान हे अध्यात्माशिवाय अपुर्ण आहे. जागतिक शांतता आवश्यक असून हे विश्वची माझे घर ही संत ज्ञानेश्वर माऊलींची संकल्पना हि जगासाठी तारणारी असेल. मी स्वतः जग आणि माझ्यापेक्षा कोणीही वेगळे नाही हे मनामध्ये रुजणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्याचा उददेश प्रत्येकांना उमगला पाहीजे. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स् हे आता प्रत्यक्षात वापरले जात असून जगाचा प्रवास इमोशनल इंटेलिजन्स् या क्षेत्राकडे निघाला असल्याची माहिती पद्मभुषण शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मधील आंतरराष्ट्रीय शोधनिंबध परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली. कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात २५ व २६ जून २०२१ या कालावधीत दोन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे आयोजन करण्यात आले होते. या परिषद मध्ये अगदेर नार्वे विद्यापीठातील डॉ. मोहन कोल्हे, कॅश्यायू संघयु विद्यापीठ, जपान येथील डॉ. कोकी वोगुरा यांच्यासह अनेक नामवंत विद्यापीठातील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेमध्ये विविध नामांकित विद्यापीठातील २५० हून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले. ही शोधनिबंध परिषद उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या परिषदेचे उद्घाटन पद्मभूषण, पद्मश्री, भारतीय शास्त्रज्ञ, डॉ. विजय भाटकर यांच्या उपस्थितीत झाले. महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद मध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मनोगत व्यक्त करताना सांगितला. ही परिषद अभियांत्रिकी प्रणालीच्या संगणकीय बुध्दीमत्तेवर आंतरराष्ट्रीय शोधनिंबध परिषद तर अभियांत्रिकी प्रणालीसाठी माहिती तंत्रज्ञानामध्ये इंटेलिजंट कॉम्पुटिंग वर आंतरराष्ट्रीय शोधनिंबध परिषद अशा दोन आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद संपन्न झाल्या.
ही आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव संजय नवले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वान्ंद कुलकर्णी चेअरपरसन डॉ. संपत देशमुख, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, कन्व्हेनर डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. गणेश बिराजदार, प्रा. ऋषिकेश देशपांडे, प्रा. अर्चना वाघमोडे, प्रा. प्रकाश गडेकर, प्रा. सुभाष पिंगळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा