भुमी अभिलेख अधिकारी व्हि. जी. शिरोळकर यांच्यावरील फौजदारी प्रकरण बंद करा असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तुळजापूर न्यायदंडाधिकारी यांना दिले आहेत. 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर सुनावणी दरम्यान खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. उस्मानाबाद येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक व्हि. जी. शिरोळकर यांच्या विरोधात तेरा वर्षापासून फौजदारी प्रकरण प्रलंबित होते. याबाबत शिरवळकर यांनी ॲड. स्नेहल कुलकर्णी महाजन यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायमूर्ती व्हि.के. जाधव आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने, तत्कालीन जिल्हा अधीक्षक व्हि. जी. शिरोळकर , यांच्या विरोधातील फौजदारी प्रकरण बंद करण्याचे निर्देश तुळजापूर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उस्मानाबाद येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे तत्कालीन अधीक्षक व्हि. जी. शिरोळकर व इतर यांच्याविरोधात तुळजापूर येथील एका शेतकऱ्याने तुळजापूर येथील न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करून कारवाईची मागणी केली होती. या अर्जावर सुनावणी घेऊन, तुळजापूर न्यायदंडाधिकारी यांनी, पोलिसांना गुन्हा नोंद करून, चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला, आणि तपास करून समरी अहवाल न्यायालयात सादर केला, परंतु त्यानंतरही तुळजापूर येथील न्याय दंडाधिकारी यांनी, व्हि. जी. शिरोळकर यांच्या विरोधातील हे प्रकरण बंद केले नाही.
जवळपास 13 वर्षे हे प्रकरण प्रलंबित असल्याने, शिवरकर यांच्यावर अन्याय होत होता. त्यामुळे व्हि. जी. शिरोळकर यांनी एडवोकेट स्नेहल कुलकर्णी महाजन यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी घेऊन, प्रकरण निकाली काढताना, याचिकाकर्त्या विरोधातील फौजदारी प्रकरण बंद करण्याचे निर्देश, खंडपीठाने, तुळजापूर न्यायदंडाधिकारी यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांच्या समरी अहवालावर म्हणणे घ्यावे, आणि कायद्यानुसार आदेश पारित करावा, असेही निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ते व्हि. जी. शिरोळकर यांच्यावतीने, ॲड. स्नेहल कुलकर्णी महाजन आणि ॲड. सागर साळुंके यांनी काम पाहिले. सरकारच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. डी. घायाळ यांनी काम पाहिले. 13 वर्षापासून प्रलंबित प्रकरणात न्याय मिळाल्यामुळे शिरोळकर यांनी समाधान व्यक्त करतानाच ॲड. सागर साळुंखे आणि ॲड. स्नेहल कुलकर्णी - महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.
![]() |
ॲड. स्नेहल कुलकर्णी - महाजन |
माझ्या पक्षकाराविरोधात तुळजापूर येथील न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसांना गुन्हा नोंद करून चौकशीचे आदेश २००८ साली दिले होते. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि तपास करून समरी अहवाल न्यायालयात दाखल केला. त्यानंतर देखील तुळजापूर येथील न्यायदंडाधिकारी यांनी माझ्या पक्षकाराविरोधातील प्रलंबित फौजदारी प्रकरण बंद केले नाही. फौजदारी प्रकरण जवळपास १३ वर्ष पासून प्रलंबित असल्यामुळे याचिकाकर्ते यांच्यावर अन्याय होत आहे. हि बाब आम्ही उच्च नायायालयाला निदर्शनास आणून दिली. तसेच उच्चन्यायालयाने यापूर्वी दिलेले न्यायनिर्णय आणि याचिकाकर्त्यातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, तत्कालीन जिल्हा अधीक्षक व्ही. जी. शिरोळकर यांच्या विरोधातील प्रलंबित फौजदारी प्रकरण बंद करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तुळजापूर येथील न्यायदंडाधिकारी याना दिले आहेत
ॲड. स्नेहल कुलकर्णी - महाजन
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा