मोटरसायकल चोरणारी टोळी गजाआड
पंढरपूर पोलिसांनी केला पर्दाफाश
![]() |
Tejsvi Satpute SP Solapur |
पंढरपूर, दि. 10 जून - पंढरपूर.
सोलापूरसह विविध जिल्ह्यातील दुचाकी चोरणार्या टोळीस पंढरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 14 लाख 15 हजार रूपयांच्या 46 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. दरम्यान या प्रकरणातील एका अट्टल आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी अभिमान उर्फ आबा खिलारे रा. मोरोची ता.माळशिरस, प्रणव ढगे रा.घानंद ता.आटपाडी, शकील शेख रा.नातेपुते व अतुल नागनाथ जाधव रा.संभाजी चौक पंढरपूर या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर विविध 25 हून अधिक गुन्हे दाखल असलेला नामदेव बबन चुगाडे याचा शोध सुरू आहे. पंढरपूर शहरातून दुचाकी चोरीस गेल्या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पाळत ठेवून एका आरोपीस ताब्यात घेतले असता तपासामध्ये त्याने 9 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
तसेच काही दुचाकी नातेपुते येथील शेख यास विकल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेतले असता 7 दुचाकी आढळून आल्या. या दोघांकडून एकूण 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या. अधिक तपासात आबा खिलारे याच्याकडून 15 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. खिलारे हा पळून जात असताना पोलिसांनी त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले. तसेच घानंद येथील प्रणव ढगे याच्या कडून 15 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या.
या प्रकरणातील आरोपी आबा खिलारे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील अट्टल चोर असून त्याच्यावर चोरी, दरोडा, बलात्कार, शस्त्र बाळगणे असे पाच पोलीस ठाण्यात 25 हून अधिक तर फरार आरोपी नामदेव चुगाडे याच्यावरही 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदूम, हवालदार शरद कदम, बिपीनचंद्र ढगे, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, हरमान मुलाणी, शोएब पठाण, शेख, महेश पवार, संजय गुटाळ, सुनील बनसोडे, सुजित जाधव, समाधान माने, विनोद पाटील, ठाणे सायबर सेलचे अन्वर आतार, प्रसाद औटी, तालुका पोलीस ठाण्याचे सुजित उबाळे हे सहभागी झाले होते.
वाळुवरील कारवाई सुरूच राहणार
मागील वर्षी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यभार हाती घेतला. त्यानंतर त्यांनी वाळुचोरांवर धडक कारवाई सुरू केली. त्यांच्या येण्यापूर्वी वाळुचोरीला राजकीय पाठबळ, तसेच माफियांचे खुलेआम सहकार्य होते. काही ठिकाणी चक्क पोलिसांकडूनच अर्थपूर्ण सहकार्य या वाळुतस्करांना मिळत होते. कडक निर्बंधांच्या काळातही वाळुचोरी सुरू होती. मात्र, सातपुते यांनी धडक कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे आता गुन्हेगारांना जरब बसू लागली आहे. यापुढेही वाळुचोरांविरोधातील कारवाई कोणत्याही दबावाला न झुगारता सुरू राहणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा