maharashtra day, workers day, shivshahi news,

बंडोबांना थोपवण्यात महाविकास आघाडी , भाजपला अपयश

 पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघात बहुरंगी लढत

दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे बंडखोरांचे आव्हान

pandharpur mangalwedha byelection , candidate , shivshahi news ,
pandharpur-mangalwedha-election

पंढरपूर -( प्रतिनिधी ) पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवार ( दिनांक . 3 ) बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले . एकूण तीस जणांनी अर्ज दाखल केले होते . त्यापैकी आज शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले .

दरम्यान , 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत . त्या मध्ये भाजपचे समाधान आवताडे , राष्ट्रवादीचे भगीरथ भालके , अपक्ष सिद्धेश्वर अवताडे , बहुजन विकास आघाडी च्या शैला गोडसे , स्वाभिमानीचे सचिन पाटील आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे . त्यामुळे प्रचाराच्या तोफा आणि त्यातून मतांच्या शह- काटशहाचे राजकारण रंगणार आहे.

11 जणांची माघार ; 19 जण रिंगणात

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेकरिता पोटनिवडणूक होत आहे . त्यासाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे . ही पोटनिवडणूक महा विकास आघाडी व भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे . यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार , राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढाकार घेत भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केली . शक्ती प्रदर्शनाने अर्जही दाखल केला .भाजप कडूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक गटाची मनधरणी करत समाधान अवताडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला . त्याद्वारे प्रारंभी त्यांच्यातच दुहेरी लढतीची चिन्हे दिसत होती . त्यादृष्टीने नेत्यांनी प्रयत्नही केले ; मात्र तब्बल 30 जणांनी अर्ज दाखल केले .त्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. अर्ज माघारीची आज अंतिम मुदत होती. निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी प्रांत गजानन गुरव यांच्या समोर अकरा जणांनी माघार घेतली. उर्वरित 19 जणांचे अर्ज कायम राहिले . प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि भाजप अंतर्गत बंडखोरी थोपवण्यात मात्र अपयश आले. त्यामुळे बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून आज पासून खऱ्या अर्थाने मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीत बंडाळी

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके मैदानात आहेत.पूर्व श्रमाची शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी कायम ठेवली.दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट आणि बंडाळी कायम राहिली.

अवताडे समोर घरातूनच आव्हान

समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी दाखल केलेली अपेक्षा उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे मंगळवेढयातूनच समाधान आवताडे यांना घरचेच आव्हान उभे ठाकले आहे. मात्र पंढरपूर चे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात परिचारक - अवताडे यांना यश आले. आप्पा सिद्धेश्वर आवताडे , शैला गोडसे व सचिन पाटील यांच्यासह अपक्षही मैदानात आहेत.

यांनी घेतली माघार

अर्ज दाखल केलेल्या पैकी महेंद्र काशिनाथ जाधव ( पिंपल्स रिपब्लिकन पार्टी ) , नागेश अण्णासो भोसले  ( अपक्ष ) , मोहन नागनाथ हळणवर ( अपक्ष ) , इलियास हाजी युसुफ शेख ( अपक्ष ) , संजय चरणू पाटील ( अपक्ष ) , अमोल अभिमन्यू माने ( अपक्ष ) , रामचंद्र नागनाथ सलगर ( अपक्ष ) , मनोज गोविंदराव पुजारी ( अपक्ष ) , बापू दादा मेटकरी ( अपक्ष ) , अशोक ज्ञानदेव वाघमोडे ( अपक्ष ) , रज्जाक उर्फ अब्दुल जाफर मुलाणी ( अपक्ष ) , या 11 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहेत.

हे आहेत रिंगणात

पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगीरथ भारत भालके ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , समाधान महादेव आवताडे ( भारतीय जनता पार्टी ) , शैला धनंजय गोडसे ( बहुजन विकास आघाडी ) , सचिन अरुण शिंदे  ( स्वाभिमानी पक्ष ), संजय नागनाथ माने. ( महाराष्ट्र विकास आघाडी) , राजाराम कोंडीबा भोसले ( बळीराजा पार्टी ) , सिद्धेश्वर भारत आवारे. ( बहुजन महापार्टी ) , बिरप्पा मधुकर मोठे ( वंचित बहुजन आघाडी ) , तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने , संदीप जनार्दन खरात , नागेश प्रकाश पवार , अभिजित वामनराव आवाडे- बीचुकले , सुनील सुरेश गोरे , सिताराम मारुती सोनवले , सिद्धेश्वर बबन आवताडे , सुदर्शन रायचंद खंदारे , कपिल देव शंकर कोळी , सुदर्शन पांडुरंग मसुरे , बिरुदेव सुखदेव पापरे हे 19 जण रिंगणात आहेत.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !