शेळवेत गळफास लावून विवाहितेची हत्या
आत्महत्येचा केला बनाव ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) शेळवे ( तालुका पंढरपूर ) येथे निकिता उर्फ सोनाली दत्तात्रेय शिनगारे ( वय 26 ) विवाहितेचा मुलीच झाल्या म्हणून हुंडा आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ केला .तसेच ती ऐकत नसल्याने तिला गळफास घेऊन ठार मारून आत्महत्या केल्याचा बनाव केला .याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिसात सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला . त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे .
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , निकिता उर्फ सोनाली हिचा शेळवे ( तालुका पंढरपूर ) येथील दत्तात्रय शिनगारे यांच्याबरोबर 2011 मध्ये विवाह झाला होता . त्यानंतर निकिताला दोन मुली झाल्या , पण मुलगा हवा म्हणून निकिता हिचा सासरकडील मंडळी छळ करीत होते .यामुळे तिचा मावसभाऊ उदय संजय पवार यांनी त्याच्या मामा विलास चव्हाण , तसेच नातेवाईक तात्या नागटिळक , संतोष चव्हाण आदीनी दोन-तीन वेळा शेळवे येथे सासरच्या मंडळींना भेटून समजावण्याचा प्रयत्न केला . तरीही सासरच्या मंडळींनी निकिताला त्रास देणे थांबवले नाही .निकिताचा दिर नितीन शिनगारे हा निकिता घरी एकटी असताना तिची छेड काढत होता .त्याला निकिताने विरोध केला असता त्यानेही जीवे मारण्याची धमकी दिली होती . याबाबत नातेवाईकांनी शिनगारे परिवाराला समजावून सांगितले.मात्र त्यांनी निकिता लाच रागवत त्याचीच बाजू घेऊन त्याच्या गैर कृत्याचे समर्थन करत होते . सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सासरची मंडळी त्रास देत होते . दरम्यान ,दि .30मार्च रोजी चा मावस भाऊ पवार यांनी फोन करून निकिता हिने शेतातील लिंबाच्या झाडास सायंकाळी 6. 30वाजण्याच्या सुमारास गळफास घेतल्याचे सांगितले . उदय पवार यांनी घटनास्थळी निकिताच्या गळ्याला असलेली व झाडाची तुटलेली दोरी पाहून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला . याबाबत त्यांनी गुरुवारी पंढरपूर पोलिसात निकिता ची आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी खून केल्याची फिर्याद दिली .यामध्ये दीर नितीन उर्फ नाना दिलीप शिनगारे , सासरा दिलीप माणिक शिनगारे , अतुल हरि गाजरे ( सर्व राहणार शेळवे ) , सखाराम ज्ञानेश्वर गाजरे , ननंद सविता सखाराम गाजरे ( दोघे राहणार इसबावी )यांनी निकिता चा गळा दोरीने आवळून जीवे ठार मारल्याचा संशय व्यक्त केला . निकिताचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांदीला अडकवून तिने गळफास घेतला असा भास निर्माण केल्याची फिर्याद दिली.त्यानुसार चौकशी करून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली .त्यांना आज न्यायालयात उभे केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत बसने हे करत आहेत.
अन् खुनाची उकल झाली
निकिता चा मावस भाऊ उदय पवार निरोप मिळताच घटनास्थळी दाखल झाले . घटनास्थळी लिंबाच्या झाडाखाली पडलेली दिसली . तिच्या गळ्याला तुटलेली दोरी होती , तर उर्वरित तुटलेली दोरी लिंबाच्या झाडाच्या फांदीला बांधलेली होती ; पण दोरी तुटली कशी ? असा संशय व्यक्त करत पवार यांनी गळ्याची पाहणी केली . त्यावेळी निकिताने गळफास न घेता तिचा गळा आवडल्याचे दिसून येत होते. त्यांनी संशय व्यक्त केला आणि गळफास घेतल्याचा बनाव केलेल्या खुनाची अखेर उकल झाली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा