maharashtra day, workers day, shivshahi news,

रविवारी जयंत पाटील करणार भालकेंच्या प्रचाराचा शुभारंभ

रविवारी जयंत पाटील करणार भालकेंच्या प्रचाराचा शुभारंभ 

Jayant Patil will launch Bhalke's campaign, pandharpur, shivshahi news
Jayant Patil will launch Bhalke's campaign

पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील महादेव मंदिरा पासून प्रचाराला होणार सुरुवात

पंढरपूर  - ( प्रतिनिधी ) पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा नारळ रविवारी रांजणी ( तालुका पंढरपूर ) येथे महादेव मंदिरात सकाळी दहा वाजता राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवला जाणार आहे .यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे व जिल्ह्यातील प्रमुख महा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी मंगळवेढा येथे नियोजनाच्या बैठकीमध्ये दिली.दरम्यान जयंत पाटील हे शनिवारी दुपारी 1 ते 3 या वेळेत पंढरपूर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत . त्यानंतर दुपारी चार वाजता मंगळवेढा येथे पदाधिकारी बैठक घेतली जाणार आहे. पंचायत समिती गणनिहाय आढावा घेतला जाणार आहे .यावेळी शहरातील प्रभागातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी होणार आहेत.रात्री पंढरपूर येथे महत्त्वाच्या व्यक्तीच्या गाठीभेटी होणार आहेत . तर रविवारी सकाळी रांझणी येथे महादेवाच्या मंदिरा पोटनिवडणूक प्रचारार्थ नारळ वाढवण्यात येणार आहे . यावेळी महा विकास आघाडीचे काही मंत्री उपस्थित राहतील . मंगळवेढा येथे गुरुवारी आमदार संजय शिंदे , राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील शहरातील पदाधिकारी यांनी जयंत पाटील यांच्या दौऱ्याबाबत नियोजन आर्थिक बैठकीचे आयोजन केले होते . याप्रसंगी संजय शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले . या बैठकीला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार , राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत बेदरे , बसवराज पाटील , चंद्रकांत घुले , अजित जगताप , विजय खावतोंडे ,मारुती वाकडे राजा राम सूर्यवंशी , सोमनाथ माळी यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते .

या बैठकीतच आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करणे , शेतकऱ्यांना जादा वेळ वीज मिळावी म्हणून केलेली मागणी तात्काळ मान्य झाली आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज उपलब्ध होणार आहे. 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !