maharashtra day, workers day, shivshahi news,

चिमुकलीवर बलात्कार ; दोषीला फाशीची शिक्षा

चिमुकलीवर बलात्कार ; दोषीला फाशीची शिक्षा 

 भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

nanded ( bhokar ) rape case, fashi, shivshahi news
nanded ( bhokar ) rape case


भोकर - ( प्रतिनिधी ) नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील एका पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम . एस . शेख यांनी आरोपी बाबुराव माळेगावकर याला फाशीची शिक्षा सुनावली. दिवशी बुद्रुक येथील या चिमुकलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना 20 जानेवारी 20२१ रोजी घडली होती. याबाबत आरोपी बाबुराव सांगेराव उर्फ बाबूराव माळेगावकर, यांच्याविरुद्ध कलम 363 , 302 , 376 ,( अ ), 376 (२)( जे ) ( एम ) , 376 (अ,ब ) , 377 भा. दंड. वि.व कलम 4 , 6 , 8, 10 , 12 पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी तपास पूर्ण करून 19 दिवसांमध्ये न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी साक्षीदाराचे पुरावे, वैद्यकीय पुरावा व आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपी बाबुराव माळेगावकर याला फाशीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार तर्फे एडवोकेट रमेश राजुरकर यांनी काम पाहिले. त्यांना एडवोकेट स्वप्निल कुलकर्णी, एडवोकेट सलीम शेख यांनी मदत केली.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !