सोलापुरात घरफोड्या करणारी उत्तर प्रदेशचे चोरटे गजाआड
रोख रकमेसह 80 हजारांचे दागिने केले जप्त
सोलापूर - ( प्रतिनिधी ) - सोलापुरात घरफोडी करणारी उत्तर प्रदेशाची टोळी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली.त्यांच्याकडून चोरीतील ऐंशी हजार दोनशे तीस रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज जप्त केला.
शहरात चोऱ्या घरफोड्या चे प्रमाण वाढले आहे. त्यावर आळा बसावा म्हणून पोलिस आयुक्तांनी शहर गुन्हे शाखेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे फौजदार संदीप शिंदे व त्यांचे पथक हे शहरात पेट्रोलिंग करत होते. उत्तर प्रदेश येथील एक पुरुष व एक महिला या दोघांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच ते चोरटे सोने विक्रीसाठी जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात येणार असल्याचेही समजले.
आरोपीची शोध घेऊन सत्येंद्र सुरेन्द्र सिंह ( वय ४४ , रा. उत्तर प्रदेश ) , कमलादेवी वीरेंद्र चौरासिया ( वय ४४ , रा. उत्तर प्रदेश ) , खुशबू फेलचंद पांडे , ( वय २४ ,रा. उत्तर प्रदेश ) , घिरनमती मोती पांडवे (वय २९ , रा. उत्तर प्रदेश ), दिल्ली या सर्वांना अटक केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी पप्पू उर्फ सुनील बबन प्रसाद वर्मा ( वय ४८ , रा. उत्तर प्रदेश ) , गोपाळ श्री गरीवराम गोंड (वय ५०, रा. उत्तर प्रदेश ), यांना उस्मानाबाद एसटी स्टँड वरून अटक करण्यात आली. या आंतरराज्य टोळी कडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा 80 हजार दोनशे तीस रुपयांचा ऐवज जप्त केला.
ही कामगिरी शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे , पोलीस निरीक्षक संजय साळुंखे , फौजदार संदीप शिंदे, पो. काॅ. मोहिते, शिंदे , पवार , शेळके , गुंड आदींनी पार पाडली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा