पंढरपूर तालुक्यातील 94 ग्रामपंचायत
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
खुला प्रवर्ग 46 तर नागरिकांचा मागासवर्ग 25, अनुसूचित जाती 10, अनु, जमाती 3सरपंच पदाचे आरक्षण
पंढरपूर -( प्रतिनिधी ) पंढरपूर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षण सोडत बुधवार दिनांक 27 रोजी शासकीय धान्य गोडाऊन येथे सकाळी अकरा वाजता काढण्यात आले. याद खुला प्रवर्ग ( ४६ ) , अनुसूचित जमाती ( ३ ), अनुसूचित जाती ( १० ), नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव ( २५ ), साठी सरपंचाचे आरक्षण काढण्यात आले.तहसीलदार विवेक साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली.
यावेळी निवासी गायब तहसीलदार एस.पी. तिटकारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पि.के. कोळी, मनोज श्रोत्री आदीसह मंडळ अधिकारी, तलाठी, प्रत्येक गावातील नागरिक उपस्थित होते. या आरक्षण सोडतीच्या वेळी अनेक गावातील सरपंच, नुकत्याच निवडणूक पार पडलेल्या गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य नागरिक उपस्थित होते.
आरक्षण पुढील प्रमाणे
अनुसूचित जमाती
तारापूर
अनुसूचित जमाती महिला
रोपळे, शेगाव दुमाला
अनुसूचित जाती
खरसोळी, पळशी, भटुंबरे, चळे, मेंढापूर, आंबेचिंचोली, सोनके, बारडी, गादेगाव, बंडी शेगाव.
अनुसूचित जाती महिला
आव्हे -तरटगाव, उंबरगाव, नेपतगाव, शिरढोण, शेवते, सुस्ते, कोंढारकी ,तिसंगी, नारायण चिंचोली, अंजनसोंडा
ना.मा.प्र
लोणारवाडी, शिरगाव, चिंचोली, भोसे, पोहोरगाव, खरातवाडी, ईश्वर वठार, गोपाळपूर, कोर्टी, बोहाळी, उपरी, जाधववाडी,व्होळे.
ना.मा.प्र महिला
जैनवाडी, केसकरवाडी, खेड भोसे, शेंडगेवाडी, गार्डी, करकंब, पुळूजवाडी,अजोती, पांढरेवाडी, तनाळी, टाकळी, गुरसाळे, सुपली.
सर्वसाधारण
बाभूळगाव, भाळवणी, भोसे, बिटरगाव, चिलाईवाडी, धोंडेवाडी, करोळे, खेडभाळवणी, मुंढेवाडी, सांगवी बादलकोट, सुगाव भोसे, नाही जातवाडीकुरोली, कान्हापुरी, गुरसाळे- वेणूनगर, वाखरी, टाकळी, अनवली, फुलचिंचोली, पुळूज, नांदोरे, तावशी, मगरवाडी.
सर्वसाधारण महिला
देवडे, एक्लासपूर, रांजणी, सरकोली, शेळवे, शेटफळ, सिद्धेवाडी -तरटगाव, उंबरे, जळवली पेहे, सुगाव खुर्द कवठाळी, देगाव, कासेगाव, खर्डी, आंबे, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, उजनी वसाहत, पिराची , कुरोली , शंकरनगर - नळी, तुंगत, नेमतवाडी.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा