maharashtra day, workers day, shivshahi news,

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक.

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक.

mobile theft, solapur, police, crime, shivsshahi news
mobile theft

सोलापूर -( प्रतिनिधी ) मार्केट यार्ड येथे वाहनामधून मोबाईल चोरणाऱ्या गणेश शेडगे व हनुमंत गाडी वडार या दोघांना जेलरोड पोलिसांनी अटक केली व त्यांच्याकडून 45 हजारांचे नऊ मोबाईल जप्त केले. उस्मानाबाद येथील परंडा येथे राहणारे प्रदीप मोहन भवारी हे 11 जानेवारी रोजी त्यांच्या वाहनात मोबाईल चार्जिंगला लावून झोपले होते. तेव्हा रात्री दोन ते साडेचार या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरला होता. तशाच प्रकारे व्यवहारे यांच्या ओळखीचे रणजीत ऋषिकेश मांजरे व दत्तात्रय माने यांचे देखील मोबाईल चोरीस गेले होते. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जेलरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी.क्षीरसागर व त्याचे पथक हे या गुन्ह्याबाबत माहिती घेत असताना एकदा 11 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की, दोन मोबाईल चोरटे हे मार्केट यार्ड येथे रोडच्या कडेला थांबून परगावी जाणाऱ्या ट्रक चालकांना मोबाईल विक्री करत आहेत. 

तेव्हा लगेच गुन्हे शाखेचे स.पो.नि. क्षीरसागर व त्यांच्या पथकाने तेथे सापळा लावला व दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा त्या दोघांनी त्यांची नावे गणेश मळसिद्ध शेंडगे (वय २२ ,रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड ) व हनुमंत राजू गाडी वडार ( वय २१, रा. मल्लिकार्जुन नगर ) अशी सांगितली. तेव्हा पोलिसांनी दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन जेलरोड पोलिस ठाण्यात आणले व त्यांची सखोल चौकशी केली.  त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवी 9 मोबाईल मिळून आले. याबाबत जेल रोड पोलिस ठाण्यात किती मोबाईल चोरीची फिर्याद दाखल होती. मोबाईल जप्त केले व तीन गुन्हे उघडकीस आणले. ही कामगिरी जेल रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे, पो.नी. शिवाजी राऊत ( गुन्हे ) , पो.नी. विश्वनाथ सिद यांच्या नेतृत्वाखाली जेल रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार शेख, बाबा शेख, राहुल दुधाळे, पोलीस नाईक रमेश गवळी, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, साबळे, चमके, सरवदे, बनसोडे, लिगडे, सुरवसे, काळे, उटगी ,राठोड यांनी पार पाडली. 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !