maharashtra day, workers day, shivshahi news,

चाकूचा धाक दाखवून माढ्यात साडेसात लाखांची चोरी

चाकूचा धाक दाखवून माढ्यात साडेसात लाखांची चोरी

madha robbery, shivshahi news,
चाकूचा धाक दाखवून चोरी

माढा- (प्रतिनिधी) माढा येथे न्यायालय परिसरात राहणाऱ्या अमृता जगताप यांच्या घरातील जिन्याच्या दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश करत, चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व मोबाईल सह सात लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. 

यासंदर्भात अमृता प्रशांत जगताप (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचे वडील अमरदीप दिगंबर भांगे, आई अश्विनी भांगे, मुलगा प्रथमेश प्रशांत जगताप यांच्यासह एकत्रित राहण्यास आहेत. नेहमीप्रमाणे ते सर्वजण गुरुवारी रात्री जेवण करून झोपले होते. फिर्यादी, त्यांची आई व मुलगा प्रथमेश असे तिघे जण हॉलमध्ये झोपले होते. फिर्यादीचे वडील अमरदीप हे बेडरूम मध्ये झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास जिन्यातून धडधड असा आवाज आला. जिन्यातून येण्यासाठी घरातूनच दरवाजा आहे. फिर्यादी, आई व मुलगा जागे झाले. आम्ही डोळे उघडून पाहिले असता आमच्या समोर चार जण उभे होते. त्यातील एकाने चाकू दाखवून हिंदीतून तुम हिलो मत, असे म्हणून एक जण आमच्यासमोर थांबून तिघेजण रूममध्ये गेले .

त्यांनी कपाटातील चार तोळ्याचे 1,40,000 किमतीच्या हातातील पाटल्या, पाच तोळ्याचे 1,75,000 किमतीचे सोन्याचे गंठण, चार तोळ्याच्या 1,40,000 किंमतीच्या बांगड्या, पाच तोळ्याचे 1 लाख 75 हजार किंमतीचे गळ्यातील लॉकेट, दोन तोळ्याचे सत्तर हजार किमतीचे मिनी गंठण, 12.5 ग्रॅमचे 42 हजार किंमतीचे कानातील फुले, एक ग्रॅम वजनाचा कळस व दोन ग्रॅम वजनाचे गळ्यातील बदाम याची अंदाजे किंमत नऊ हजार रुपये, सॅमसंग कंपनीचा दहा हजार किमतींचा मोबाईल, असा एकूण सात लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर सोलापूर हुन पोलिसांनी श्वान पथक मागवले. पथकातील श्‍वान हे घर घराच्या परिसरातच घुटमळले. अप्पर पोलीस अधीक्षक आतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास सपोनि अमोल कादबाने करीत आहेत. माढा शहरात गेल्या आठवडाभरात चार मोटारसायकलची दिवसाढवळ्या चोरी  झाली असून तपासाचे माढा पोलिसाकडे आव्हान आहे. 

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !