पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक येथे सत्तांतर
तरूणाईचा दणदणीत विजय
रोपळे विकास पॅनलने १५ पैकी १३ जागा जिंकल्या
पंढरपूर - (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या रोपळे ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी दिनकर बापू कदम गटाचा दारुण पराभाव झाला असून, गावात तब्बल 25 वर्षाने सत्तांतर झाले आहे. बहुतांश तरुण उमेदवार असलेल्या, रोपळे विकास पॅनलने 15 पैकी 13 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे.
पंढरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम झाल्यापासूनच, रोपळे ग्रामपंचायत निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कारण या निवडणुकीमध्ये, गेली 25 वर्षे गावच्या सत्तेत असलेले आणि मुरब्बी नेते, विद्यमान सरपंच दिनकर बापू कदम, यांच्यासमोर रोपळे विकास पॅनलच्या तरुण आणि नवोदित उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले होते. हनुमंत (दादा) कदम, विलास भोसले (मेजर), पोपट (दादा) कदम, महेश (नाना) कदम, अशा जुन्या-नव्या राजकारणी मंडळींच्या नेतृत्वामध्ये आणि शिवाजी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनात रोपळे विकास पॅनलच्या उमेदवारांनी ही लढत उभारली होती खरी, परंतु बहुतांश नवखे, तरुण आणि तुलनेने राजकारणाचा कमी अनुभव असलेले उमेदवार घेऊन 25 वर्षे सत्तेत असलेले, आणि तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेले दिनकर बापू कदम यांच्या सोबतचा हा सामना तसा अवघडच होता. परंतु या तरुण उमेदवारांनी शिस्त व संयमाचे दर्शन घडवत मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले, आणि पंधरापैकी तेरा जागांवर विजय मिळवत घवघवीत असे यश संपादन केले .
5 वॉर्ड पैकी वॉर्ड क्रमांक एक मध्ये
नंदा बंडगर यांनी नवनाथ बंडगर यांचाहनुमंत कदम यांनी गणेश कदम यांचा
तर सावित्रा रितोंड यांनी सुरेखा खपाले यांचा
पराभव केला आहे
वॉर्ड क्रमांक दोन मधून
शशिकला चव्हाण,
नसिफा शेख व
विजया कदम यांनी
बाजी मारली आहे
वॉर्ड क्रमांक 3 मध्ये
विष्णू खरे यांनी काजल खरे यांना
मंगल मारुती पाटोळे यांनी मंगल दत्तात्रय पाटोळे यांना
व कमल लोखंडे यांनी मंदाकिनी माळी
यांना धोबीपछाड दिला आहे
वॉर्ड क्रमांक चार मध्ये
गोविंद बंडगर यांनी दादासाहेब कांबळे
विलास भोसले यांनी महादेव भोसले व अभिमन्यु बिस्किटे
तसेच उषा शेळके यांनी ज्योती भोसले
यांच्यावर मात करून विजय संपादन केला आहे
वॉर्ड क्रमांक पाच मध्ये
सर्वात जास्त चुरस पाहायला मिळाली या वर्ड मध्येसारिका भोसले यांनी अलका गायकवाड यांना
सुरेखा नागनाथ जाधव यांनी सुरेखा बालाजी जाधव यांना
तर अनिल दत्तात्रय कदम यांनी विद्यमान सरपंच दिनकर कदम यांना
पराभूत करून विजय संपादन केला आहे
सर्व विजयी उमेदवारांना माननीय आमदार प्रशांत परिचारक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच शिवाजी भोसले (साहेब), विलास भोसले (मेजर), पोपट (दादा) कदम, हनुमंत (दादा) कदम, अनिल (नाना) कदम, महेश (नाना) कदम, व रोपळे विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी रोपळे ग्रामस्थांचे आभार मानले आहेत
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा