maharashtra day, workers day, shivshahi news,

उच्चशिक्षित तरुण निवडणुकीच्या रिंगणात - रोपळे येथे चुरस

उच्चशिक्षित तरुण निवडणुकीच्या रिंगणात

 निवडणूक चुरशीची होणार

anil kadam, dinkar kadam, grampanchayat nivadnuk, ropale BK , pandharpur, shivshahi news
anil (nana ) kadam


पंढरपूर -  (प्रतिनिधी)  ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटले, की गावातील ठराविक राजकारणी मंडळी यांचाच बोलबाला असायचा. ज्यांचे गावात सामाजिक क्षेत्रात वजन आहे किंवा मसल पावर आहे असेच लोक शक्यतो निवडणुकीमध्ये उतरत असत. सत्तेच्या राजकारणामध्ये तरुणांना फारच कमी संधी मिळायची. त्याचप्रमाणे शिकलेली किंवा सभ्य माणसे राजकारणापासून अंतर राखून दूरच असायचे. परंतु आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. समाजाच्या अनेक स्तरातील लोक राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत,  हि खूप चांगली बाब आहे.
यावेळी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये तरुणांचा आणि उच्चशिक्षित तरुणांचा प्रत्यक्ष सहभाग हा जसा राजकारणाचे चित्र बदलणार आहे, तसाच सर्वसामान्यांसाठी सुखावणारा ही आहे.  सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्या गावांमध्ये निवडणूक लागली आहे, तिथे उमेदवारांची धावपळ सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत, त्यामध्ये पारंपारिक उपायांबरोबरच प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामध्येच पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावाची ही निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये रोपळे गावची निवडणूक ही विशेष लक्षवेधी ठरली असून, संपूर्ण तालुक्याचे या गावाकडे लक्ष लागले आहे. त्याचे कारण म्हणजे उच्चशिक्षित तरुणांचा निवडणुकीतील सक्रिय सहभाग.
निवडणूक घोषित झाल्यापासूनच रोपळे गावातील राजकीय हालचालींना वेग आला होता. प्रत्येक पॅनल प्रमुख आपापले उमेदवार, मतदार यांच्या भेटी घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागले होते. परंतु या निवडणुकीमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने प्रवेश केला आणि गावचे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
इंजिनिअर असलेल्या आणि मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेल्या अनिल कदम यांनी निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि गावातील निवडणुकीला एक वेगळेच वळण मिळाले. सुरुवातीला अनेकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला, मात्र अनिल कदम हे आपल्या मतावर ठाम राहिले. राजकारण जर दलदल असेल. तर ती साफ करण्यासाठी स्वच्छ माणसाने दलदलीत उतरावेच लागते. या न्यायाने हा उमदा तरुण सक्रिय राजकारणात उतरला. मुळात अतिशय शांत, संयमी, पण कणखर स्वभावाचे अनिल कदम, हे निवडणुकीत उतरल्याने गावातील तरुणांनी आनंद व्यक्त केला. पारंपारिक कुरघोड्यांच्या राजकारणाला बगल देत, अनिल कदम यांनी सरळमार्गी राजकारण करण्याचे सूतोवाच, केल्याने त्यांना गावात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. परंतु अनिल कदम यांच्यासमोर आव्हानही सोपे नाही गावामध्ये अनेक वर्ष सत्तेत असलेले तसेच जिल्ह्यात आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये चांगली ऊठबस असलेले, विद्यमान सरपंच दिनकर बापू कदम, हे अनेक वर्षे राजकारणात असून गावच्या सत्तेतही आहेत. त्यामुळे दिनकर बापू कदम आणि अनिल नाना कदम यांच्यामध्ये होत असलेली ही लढत तालुक्याच्या राजकारणात लक्षवेधक ठरली आहे. एकूणच रोपळे बुद्रुक येथील यावेळची ग्रामपंचायत निवडणूक ही चुरशीची होणार असून, मुरलेले राजकारणी आणि विद्यमान सरपंच दिनकर कदम विरुद्ध, उच्चशिक्षित इंजिनीयर अनिल कदम यांच्यामधील ही लढत कशी होते आणि मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपला कौल देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !