maharashtra day, workers day, shivshahi news,

काँग्रेस अध्यक्ष निवडीची मागणी

काँग्रेसमध्ये खडाजंगी संघटनात्मक
निवडणुकीत अध्यक्ष निवडीची मागणी


indian national congress president election, new dehlli shivshahi news, soniya gandhi, rahul gandhi,
indian national congress

जून मध्ये कोणत्याही परिस्थितीत नवा अध्यक्ष : वेणुगोपाल
नवी दिल्ली - ( प्रतिनिधी ) संघटनात्मक निवडणुका तत्काळ घेऊन अध्यक्षपदाची निवड करण्यात यावी ,या मागणीवरून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार खडाजंगी झाली. आनंद शर्मा , गुलाम नबी आझाद आणि पी. चिदंबरम यांनी अध्यक्षपदाची निवड तत्काळ करण्याची मागणी केली ; तर काँग्रेस कार्यकारणी सदस्य आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या मागणीला जोरदार विरोध केला. त्यावरून जोरदार वादावादी झाली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षांची निवड जूनमध्ये होईल, असे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर जाहीर केले.
काँग्रेस अध्यक्ष निवडीची चर्चा गेले अनेक महिने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी समितीची आभासी बैठक झाली.त्यावेळी अध्यक्ष निवडीबद्दल असे मतभेद उफाळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम यांनी तत्काळ संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याची मागणी केली. अध्यक्ष निवड झाल्यानंतर आपल्याला पुढील कार्यवाही करता येईल, असे शर्मा यांनी सांगितले. यांना मुकुल वासनिक आणि चिदंबरम यांनी सहमती दर्शवली असतानाही काही लोक निवडणुकीची भाषा करत आहेत. त्यांचा सोनिया गांधी यांच्यावर विश्वास नाही काय ? निवडणूक झाली नाही तर काँग्रेस संपेल काय, असा संताप सवालही गेहलोत यांनी केला. बंडखोरीची भाषा करणाऱ्यांनी ते स्वतः किती वेळा निवडून येऊन मंत्री झाले? आणि कार्यकारणी मध्ये ते किती वेळा निवडून आले , हेही सांगावे , असे आव्हान गेहलोत यांनी दिले. गेहलोत यांना ओमान चंडी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पाठिंबा दिला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे निवड लांबली
बैठकीतील गदारोळानंतर येता मे पर्यंत संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी.त्यानंतर जून पर्यंत अध्यक्ष निवड करण्यात यावी, यावर सर्वांचे एकमत झाले. यासंदर्भात बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, मार्च ते मे दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक निवडणूक कार्यक्रमात बदल करावा, अशी विनंती सर्व सदस्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना केली.त्यानुसार जून पर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !