maharashtra day, workers day, shivshahi news,

जिल्ह्याचा विकास व कोरोना मुक्तीवर भर - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

जिल्ह्याचा विकास व कोरोना मुक्तीवर भर

प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निर्धार

dattatray bharane, 26 janevari, republic day, solapur, shivshahi news
dattatray bharane

सोलापूर-( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देतानाच जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते. पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता ध्वजवंदन झाले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.
          गेले वर्ष करोना महारिशी लढण्यात गेले ; मात्र विकासाची गती कायम राहिली. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून रस्ते, जलसिंचन, शेती, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रातील विकास होईल, असा मला विश्वास आहे. असे पालकमंत्री भरणे म्हणाले. गेल्या वर्षभरात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका,जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय मोलाचे काम केले आहे. त्यांच्या या कामामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोना वर नियंत्रण आणण्यात यश मिळाले आहे. आता लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने अतिशय चांगले नियोजन केले आहे. या लसीकरणाला नागरिकांनी सहकार्य करावे. लसीकरणाची मोहीम यशस्वी करू या, आपला जिल्हा कोरोना मुक्त करूया. यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेती, घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडून 250 कोटी रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला आहे ‌. आणखीन 250 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्याचेही वितरण लवकरच केले जाईल.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही देतो, असे भरणे यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय व पोलिस ठाणे हद्दीच्या अद्यायावत नकाशांचे अनावरण भरणे याच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त दिपाली घाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, महसूल, पोलीस, आरोग्य, सहकार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघा शिर्के -होमकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तर नवीन प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !