शरद पवार बनणार 'संपुआ ' चे अध्यक्ष ?
![]() |
sharad pawar |
सोनिया गांधी रजकारणातून निवृत्त होण्याची श्यक्यता
शेतकरी आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच संयुक्त पुरोगामी आघाडीतही (संपुआ )जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत . नजीकच्या काळात काग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या राजकीय संन्यास घेऊ शकतात . त्याच्या जागी संपुआच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विचार होऊ शकतो ,असे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने गुरुवारी दिले आहे . प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया राजकारणातून बाहेर पडण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहेत . असे झाल्यास त्याच्या जागी कोणाची नियुक्ती करावयाची याबाबत काग्रेसच्या गोटात खलबते सुरु झाली आहेत . मत्सुद्दी आणि अनुभवी राजकारणी, आघाडीतील सर्व पक्षांना सांभाळून घेणारा आणि मोदींचा करिश्मा असतानाही शक्य तिथे केंन्द्रतील सरकारची कोंडी करू शकणाऱ्या नेत्याने त्यांची जागा द्यावी , अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . या पार्श्ववभूमीवर काही जणांची नावे चर्चेत आहेत . पवार यांच्या नावावर आद्यप एकमत झालेले नाही .मात्र अशा नेत्यांच्या यादीत त्याचे नाव अगदी वर असल्याचे सांगितले जाते . कांग्रेसमधील काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा आग्रह धरला असला तरी सोनिया गांधी त्यास राजी नाहीत, असेही बोलले जाते . घटक पक्षातील अनेक नेते वरिष्ठ आणि अनुभवी आहेत . त्यामुळे ममता बानर्जी, एम. के .स्टलिन यांच्यासारखे काही नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास अथवा त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार होणार नाहीत . हे ओळखूनच सोनिया गांधी यांनी या पदासाठी राहुल गांधींचा विचार केला नसल्याचे सांगण्यात येते .
शरद पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत .सर्व घटक पक्षाना एकत्र ठेवण्याची किमया त्यांना साध्य आहे . महाराष्ट्र्रात सत्ता परिवर्तन करून त्यांनी त्यांची चुणूक दाखवली आहे . त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार प्रामुख्याने केला जात असल्याचे समजते कृषी विधायक मागे घेण्याच्या मागणीसाठी पवार यांच्यासह कॉंन्ग्रेस नेते राहुल गांधी ,डाव्या पक्षाचे नेते डी . राजा ,सीताराम येचुरी यांनी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली होती . यानिमित्ताने या पदाबाबत येचुरी यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्याचे सांगितले जाते