राहुल गांधीमध्ये सर्वोत्तम होण्याची तीव्र इच्छा नाही !
 |
Rahul_Gandhi_&_Barack_Obama |
कांग्रेस नेते राहुल गांधी हे नर्व्हस (चिंताग्रस्त ) व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्यामध्ये एखाद्या विषयात सर्वोत्तम होण्याची तीव्र इच्छा नाही, असे मत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, बाराक ओबामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून व्यक्त केले आहे.
बाराक ओबामा यांचा आत्मचरित्रात दावा ; डॉ . ममोहनन सिंग प्रामाणिक नेते !
 |
obama_&_manmohan_sinh |
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शांत आणि प्रांमाणिक असल्याचेही ओबामा यांनी म्हटले आहे. ओबामा यांचे 'अ प्रॉमिस्ड लँड' हे ७६८पानांचे आत्मचरित्र १७ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले. तत्पूर्वी "न्यूयार्क टाइम्स " ने यातील काही भाग प्रसिद्ध केला आहे. पुस्तकात ओबामांनी इतर देशाच्या नेत्यांबाबत लिहिले आहे. राहुल गांधी हे नर्व्हस असल्याचे सांगत ओबामांनी लिहिले आहे कि, राहुल गांधी हे अशा विद्यार्थ्यांसारखे आहे. जो शिक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, अभ्यासात हुशार होण्याची योग्यता किंवा तीव्र आवड त्यांच्याकडे नाही; हाच त्यांचा कमकुवतपणा आहे. तर डॉ . मनमोहन सिह हे शांत आणि प्रामाणिक व्यक्तीमत्व आहे, असेही ओबामांनी लिहिले आहे. रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन शारीरिकदृष्ट्या सर्वसामान्य असल्याचे ओबामांनी म्हटले आहे. अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडेन हे सज्जन, प्रामाणिक आणि निष्ठावान असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांना महत्व मिळत नाही, असे लक्षात आले तर त्यांना राग येतो. युवकांसोबत काम करताना या गुणामुळे वातावरण बिघडू शकते, असेही ओबामांनी म्हटले आहे. सोनिया गांधींचाही उल्लेख पुस्तकात ओबामांनी म्हंटले आहे कि, चार्ली क्रिस्ट आणि रेहेम इमॅन्युएल या पुरुषांच्या हँडसम असण्याबाबत सांगितले जाते. मात्र , महिलांच्या सौंदर्याबद्दल सांगितले जात नाही. केवळ एक दोन अपवाद असतील. जसे कि, सोनिया गांधी. ओबामांनी मोदींची केली होती स्तुती
 |
narendra_modi_&_barack_obama |
२०१५ मध्ये "टाइम "नियतकालिकाने नरेंद्र मोदी याना सर्वात प्रभावशाली १०० लोकांमध्ये स्थान दिले होत. त्यावेळी ओबामांनी "टाइम "मध्ये लिहिलेल्या लेखात मोदींना "रिफॉमर -इन -चीफ "म्हंटले होते. गरिबीतून पंतप्रधानपदापर्यंत मोदींनी केलेल्या प्रवासात भारताच्या प्रगतीच्या शक्यता आणि जोश दिसून येतो, असेही ओबामांनी म्हंटले होते .ही ८-१० वर्षांपूर्वीची गोष्ट : कॉग्रेसचे स्पष्टीकरणं
 |
soniya_gandhi Indian national congress |
दरम्यान ,ओबामा यांच्या या मतानंतर कॉग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. कॉग्रेसचे तारिक अन्वर यांनी ओबामा - राहुल भेट ८-१० वर्षपर्वी झाली होती. यावरून राहून गांधींचे आकलन करणे अवघड आहे. तेव्हापासून राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वात बदल झाला आहे . त्यांना मोठा अनुभव मिळाला आहे. तर कॉग्रेस नेते मोनिका टागोर यांनी ट्विट केले आहे कि , मी ओबामांना अनफोलो करण्याचा निर्णय घेतला आहे. काही नेटकऱ्यानी ओबामाविरोधात मोहीमही चालवून राहुल गांधीची माफी मागा ,अशी मागणी केली आहे .