बिबट्याच्या शोधासाठी आमदार रोहित पवार निघाले पायीच
 |
rohit_pawar_karamala |
बिबट्याने धुमाकूळ घातलेल्या करमाळा भागाचा आ. रोहित पवारांनी नुकताच दौरा केला आहे. बिबट्याचा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. शार्पशुटर, पोलीस, ग्रामस्थ, आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेची माहिती घेतली.स्थानिक प्रशासनाला या कामी शासनाकडून शक्य ती मदत मिळवून देण्याचेही वाचन यावेळी रोहित पवारांनी दिले. इतक्यावरच आ. रोहित पवार थांबले नाहीत तर त्यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून स्वतः बिबट्याच्या शोधात पायीच निघाले. आणि बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीने ग्रामस्थ आणि प्रशासनाला चांगलाच धीर आला आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने कंबर कसली आहे.
नरभक्षक बिबट्याचा प्रशासनालाही चकवा
तीन दिवसांपासून ग्रामस्थांसह ऊसतोड मजूर दहशतीत
 |
संग्रहित चित्र |
करमाळा तालुक्यातील नरभक्ष बिबट्या गेल्या तीन दिवसापासून गायब झाला असून ड्रोन कॅमेरा ,डॉग स्काड तसेच ठिकठिकाणी पिंजरे लावून शोधाशोध करणाऱ्या प्रशासनालाही बिबट्याने चकवा दिला आहे . त्यामुळे ग्रामस्थांसह ऊसतोड मजूरही दहशतीच्या छायेत वावरत आहेत . करमाळा तालुक्यातील केडगाव शिवारात ऊसतोड मजुराच्या मुलीचा बिबट्याने जीव घेतल्यापासून ऊसतोड मजूर जीव मुठीत धरुन दिवस काढत आहेत केडगाव शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग अथक प्रयत्न करूनही अयशस्वी झाला आहे . येत्या दोन दिवसांत त्याला जिवंत अथवा मृत पकडणारच , असा निर्धार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे . त्यादृष्टीने गुरुवारी डॉग स्काड (श्वानपथक )तैनात करण्यात आले . ड्रोन केमेऱ्याच्या सहाय्यने बिबट्याचा शोध सुरु आहे . शेटफळ येथे बिबट्याने कोल्ह्याचा फडशा पडल्याची घटना ही निरर्थकअसून ७ डिसेंबर नंतर बिबटया अथवा त्याचे ठसे आढळले नाहीत . त्यामुळे बिबटया संदर्भात कोणतेही अफवा पसरवू नये ,असे आवाहन वन विभागाने केले आहे . केडगाव शिवारातील ऊसतोड मजुरावरील हल्ल्यानंतर बिबटया शेटफळ ,दहिगाव भागाकडे पळाल्याचेस्पष्ट झाले . त्यानंतर पुन्हा बिबट्या व बिबट्याचे ठसे कोठीही दिसून आले नाहीत विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले . हा बिबट्या नरभक्षक असून दहिगाव व वांगी नंबर शेलगाव ,वांगी ४ आदी ठिकाणी वन विभागाने शोधमोहीम राबवली आहे . मात्र बिबट्याने कोठीही हल्ला केल्याचे व शेळी , मेंढी ,कुत्रे मारल्याचे निदर्शनास आले नाही . उजनी भागातील दहिगाव , वांगी या नागरिकांनी तसेच शेजारच्यागावातील व शिवारातील लोकांनी दक्षता घ्यावी .कोणीही एकट्याने शेतात जाऊ नये .लहान मुलांना व वयस्कर माणसांना घरातच ठेवावे ,असे आवाहन वन विभागाने केले आहे .दरम्यान शेलगाव ,वांगी भागात वन विभागाने जनजागृती सुरु केली . गर्मस्थाना सतर्क राहण्यासाठी आवाहन केले आहे.
अफवांचे पीक
 |
social media |
करमाळा तालुक्यात बिबट्या दिसल्याचे फोन व सोशल मीडियावरून पोंस्ट व्हायरल केल्या जात आहेत . बिबट्या पकडल्याचे चुकीचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे प्रशासनच्या अडचणी वाढत आहेत .अशा पोस्ट व्हायरल करणारे आणि अफवा पसरवणाऱ्या वर कारवाईची गरज आहे . वन विभागाचे दीडशे कर्मचारी बिबट्याच्या मागावर असून प्रत्येक गावकऱ्यांना वन विभागाने बिबट्या दिसल्यास माहिती देण्यासाठी भ्रमणध्वनी नंबर दिला आहे . माहित नसल्याने बिबट्याच्या शोधमोहिमेत अडथळा निर्माण होत आहे . नागरिकांनी बिबट्याबाबत योग्य माहिती वन विभागास द्यावी . येत्या काही दिवसात बिबट्यास जेरबंद करू .