maharashtra day, workers day, shivshahi news,

प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत वाढवली - पंढरपूरकरांना मिळणार स्वस्त घर

पंढरपूरात मिळणार स्वस्त घर 

प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत वाढवली 

PMAY-PANDHARPUR, shivshahi news

PMAY-PANDHARPUR
पंढरपूर (बातमीदार ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत सर्वाना घर असावे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली होती. या योजने अंतर्गत पंढरपूर नगर परिषदेने भक्तिमार्ग येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २२०० घरांचा भव्य प्रकल्प सुरु केला आहे . या प्रकल्पात ३ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्याला अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वतःचे घर घेता येणार आहे . या प्रकल्पातील १ बी एच के घराची किंमत ८. ४५ लाख असून प्रधानमंत्री आवास योजनेची २.५० लाख अनुदानास हे लाभार्थी  पात्र ठरणार आहेत . त्यामुळे या घरांसाठी लाभार्थी  कुटूंबाला ५ .९५ लाख इतकी किंमत पडणार आहे . 

या प्रकल्पात एकूण १३ इमारतींसह २२०० प्लॅट असणार आहेत. त्यासोबतच संपूर्ण परिसराला कंपांउंड, मेनगेट, मंदिर, बाग आदी सर्व सुविधांनी युक्त  असा हा प्रकल्प असणार आहे . विठ्ठ्ल मंदिर ,बस स्टॅन्ड , रेल्वे स्टेशन, मार्केट, दवाखाना इत्यादी सर्व सुविधाही या प्रकल्पाच्या जवळच उपलब्ध आहेत. या प्रकल्पात घरं घेण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन फार्म भरावा लागणार असून हा फार्म भरण्याची अंतिम तारीख आधी १५ डिसेंबर पर्यंत होती, ती आता वाढवून ३१ डिसेंबर अखेर पर्यंत केली आहे .

pmay-padharpur-nagar-parishad, shivshahi news
PMAY-PANDHARPUR

प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म कसा भरावा ?

पंढरपूर नगर परिषदेने सुरु केलेल्या ,प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्पात घर घेण्यासाठी, पात्र नागरिकांनी ऑनलाईन आवेदन पत्र (फार्म ) भरायचा आहे. प्र.म. आ.यो. च्या कार्यालयात या फार्मची लिंक उपलब्ध करून दिली जाते. किंवा या बातमीतील वरील लिंकवर किल्क करूनही आपण हा फार्म भरू शकता. लिंक ओपन होताच आपण आपली सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे . मासिक उत्पनासह आपली संपूर्ण माहिती भरून झाल्यावर या फार्मची प्रिंट करायची आहे. त्यासोबतच लाभार्थी नागरिकाने स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्डच्या प्रति सेल्फ अटॅचड करून या फार्म सोबत जोडायच्या आहेत. त्यानंतर मुख्याधिकारी, नगर परिषद पंढरपूर, यांच्या बँक खात्यात अनामत रक्कम रु . १०,००० लाभार्थीच्या स्वतःच्या खात्यातून गुगल पे, फोन पे, ऑनलाईन किंवा, एन. एफ. टी. द्वारे भरायचे आहेत. आणि पैसे भरल्याची पावती फार्म सोबत जोडायची आहे. असा संपूर्ण भरलेल्या फार्म आणि सर्व कागतपत्रासह प्रधानमंत्री आवास योजनेच्या, भक्ती मार्गावरील प्रकल्प कार्यालयात जमा करायचे आहेत. 

PMAY-PANDHARPUR, nagar parishad pandharpur, shivshahi news
PMAY-PANDHARPUR

त्यानंतर पात्र लाभार्थ्यांमधून लॉटरी पद्धतीने काढून या घराचे वाटप होणार आहे. सदनिका मंजूर झालेल्या लाभार्थी नागरिकांना सदनिका मंजूर झाल्यास घराची उर्वरित रक्कम भरून घराचा ताबा मिळणार आहे. तसेच या घरासाठी पात्र लाभार्त्याना बँकेचे कर्जही मिळू शकेल. सदनिका मंजूर झाल्यास लाभार्थी नागरिक कर्जासाठी बँकेत अर्ज करू शकतात. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन पंढरपूर नगर परिषद व प्रधानमंत्री आवास योजून प्रकल्प अधिकारी यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !