ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन
 |
रवी पटवर्धन |
भारदस्त देहयष्टी आणि तितक्याच भारदस्त आवाजाने प्रत्येक भूमिकेवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते . त्यांचा मागे पत्नी नीता , दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे . रविवारी दुपारी त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . शवसनाचा त्रास होत असल्याने शनिवारी दुपारी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे रात्री निधन झाले . गिरंणगावातच वाढलेल्या मराठमोळ्या पटवर्धन यांनी वयाच्या ७ व्या वर्षी मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले . १९४४ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाच्या शतकमहोत्सवी नाट्यमहोत्सवात देवाचे मनोराज्य या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या पटवर्धन यांनी नंतर सलग ७६ वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले . १९७१ मध्ये अशा असावा सुना हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट त्यानंतर अंकुश ,प्रतिघात, तेजाब अशा हिंदी तर मराठीत उंबरठा ,सिहासन या सारख्या अनेक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या त्यांनी २०० हुन अधिक हिंदी -मराठी चित्रपटात काम केले. अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले . "आमची माती- आमची माणसं "या सह्याद्री वाहिनीवरील मालिकेने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. बीबीसी वहिनीने या मालिकेतील गप्पागोष्टीची दखल घेतली . या मालिकेने खुप नांव दिले , लाल गुलाबी भेट हे त्यांचे सह्याद्री वाहिनीवरील पहिले नाटक होते . वयाच्या ८४ व्या वर्षीही ते नाटक चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमात कार्यरत होते . सध्याही ते झी मराठी वर अगंबाई सासूबाई या मालिकेत काम करत होते .