maharashtra day, workers day, shivshahi news,

आता वरुण धवन ,अनिल कपूर आणि नितू सिंगही कोरोनाच्या विळख्यात ?

 आता वरुण धवन ,अनिल कपूर आणि नितू सिंगही कोरोनाच्या विळख्यात ?

anil kapoor, - varun dhawan, - nitu sinngh, covid 19, shivshahi news
anil kapoor - varun dhawan - nitu sinngh

अमिताभ बच्चन व ऐशवर्य राय -बच्चन यांच्यापासून अर्जुन कापूरपर्यंत अनेक सेलिब्रटी कोरोनाच्या विळख्यात अडकले होते . आता "जुग जुग जियो " चित्रपटाचे चंदिगढमध्ये चित्रकरण करत असलेलया वरुण धवन ,अनिल कपूर आणि नितू सिंग कपूर यांनाही कोरोनाची लागण झालेली समजते आहे . 

या चित्रपटाचे राज मेहताही कोरोना संक्रमित झाले आहेत . मात्र चित्रपटाशी संबंधित टीमने याबाबतच्या वृत्ताची अद्याप पुष्टी केलेली नाही चित्रपटाशी निगडित सूत्रांनी म्हटले आहे की  सध्या शूटिंग थांबवण्यात आले आहे . अलीकडेच अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते . ते सध्या हिमाचल प्रदेशात असून तेथेच कोरंटाईन आहेत . 

यावर्षीच ३० एप्रिलला ऋषी कपूर यांचे निधन झाले होते . यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा "जुग जुग जियो " हा पहिलाच  चित्रपट आहे . शूटिंग साठी रवाना होत असताना नीतू यांनी सोशल मीडियात एक फोटो शेयर करून लिहिले होते कीं 'या कठीणं काळातील माझी पहिली फ़्लाईट . मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे . कपूर साहेब ,माझा हात धरण्यासाठी तुम्ही इथे नाही ;पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्यासोबत आहात "जुग जुग जियो " मध्ये वरुण ,नितू आणि अनिल कपूर यांच्या समवेत कियारा अडवाणींनी प्रमुख भूमिका आहे . हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे .  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !