मराठा क्रांती मोर्चा ८डिसेंबरला विधान भवनावर धडकणार
राजस्तरीय बैठकीत निर्णय ;"महावितरण "वरही निदर्शने
मराठा क्रांती मोर्चा ( संग्रहित चित्र )
मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी ८डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राजस्तरीय बैठकीत घेण्यात आला . मराठा क्रांती मोर्चाच्या राजस्तरीय निर्णयक बैठकीस विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते .
मोर्चाचे राज्य समन्व्यक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजस्तरीयनिर्णयक बैठक येथे पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना कोंढरे म्हणाले कि,विधिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन मुंबईत होणार आहे. या पर्शवभूमीवर या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली.महावितरण मध्ये मराठा समाजाच्या तरुणाची भरती प्रक्रिया रखडली आहे.
४ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्याल्यामध्ये संबंधित जिल्हासमन्व्यकाची बैठक झाली . ८डिसेंबर रोजी प्रत्येक जण आपापल्या वाहनातून मुंबईतील विधान भवन येथे धडक मोर्चात सहभागी होणार आहेत .
अधिवेशन पुढे ढकलल्या स त्या अधिवेशनाची तारीख पाहून पायी "लॉंग मार्च "काढला जाणार आहे. परंतु, याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन दिशा ठरवली जाईल,असेही त्यांनी सांगितले .
दरम्यान ,दिल्ली येथून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या बैठकीमध्ये सहभाग नोंदविला . ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका ठोसपणे मांडणे गरजेचे आहे.
बैठकीला राज्य समन्व्यक संभाजी भोरे -पाटील ,विकास पासलकर,राजेंद्र कुंजीर ,धनंजय जाधव , रघुनाथ चित्रे -पाटील,तुषार काकडे , मीना जाधव ,श्रतीक पाडाळे , सारिका जकताप ,
बाळासाहेब अमराळे यांच्यासह मुंबई ,रायगड ,कोल्हापूर , सांगली ,सातारा ,सोलापूर नगर , औरंगाबाद , नाशिक आदींसह सर्व जिल्हा समन्व्यक उपस्थित होते .