हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा , शिवसेनेचा दसरा मेळावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहान
उद्धव ठाकरें |
दरवर्षी प्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला गेला , परंतु या वर्षी तो शिवाजी पार्कला न घेता सावरकर स्मारकाला घेण्यात आला . शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनेचा दसरा मेळावा महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या आकर्षणाचा विषय आहे . सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत तर या मेळाव्याची शिवसैनिक वर्षभर वाट पाहत असत . कारण दसरा मेळाव्यात साहेबांचे भाषण ऐकणे हि एक पर्वणीच असे . उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतरही काही मेळाव्यात बाळासाहेबच आकर्षणाचे केंद्र राहिले होते . बाळासाहेबानंतर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे संबोधित करू लागले. आज पर्यंत प्रत्यक्ष राजकारणात कधीही सहभागी न होणारे ठाकरे घराणे आता सक्रिय आहेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन ठाकरे घराण्याच्या प्रत्यक्ष राजकारणाची सुरुवात केली. नंतरच्या काही अनपेक्षित घटनाक्रमामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले . उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरचा हा पहिला दसरा मेळावा असल्याने शिवसैनिकांबरोबरच संपूर्ण देशाचे या मेळाव्याकडे लक्ष लागले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बोलणार होते. ते काय बोलतात त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार हे नक्की होते.
![]() |
udhhaav thakarye |
कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांप्रमाणेच माझ्या तमाम हिंदू बांधवानो , बहिणींनो, आणि मातांनो अशी सुरुवात केल्याने विरोधकांचा जरा भ्रमनिरासच झाला असणार कारण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन केली आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते तेव्हापासूनच भाजपसह शिवसेनेचे विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आले आहेत कि उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे आणि त्यामुळे काल उद्धव ठाकरे हिंदू असा स्पष्ट उल्लेख करणार नाहीत असाच जाणकारांचा अंदाज होता परंतु तसे झाले नाही कालच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीतील सर्वच बाबींचा उल्लेख करत कधी आक्रमक तर कधी संयमित असे भाषण केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची संख्या मर्यादित असली तरी उद्धव ठाकरे काल चांगलेच उत्साही दिसत होते
![]() |
उद्धव ठाकरें |