नुकताच आयुष्यमान खुराणाच्या एका आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. चित्रपट सृष्टीत टॅलेंटच्या बळावर नाव कमावणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये आयुष्यमानचे नाव घेतले जाते . वेगळ्या भूमिका आणि उमदा अभिनयाच्या जोरावर आयुष्यमानने स्वतःला सिद्ध केले आहे आजवर आयुष्यमानने अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत बॉलिवूडच्या चमकोगिरीत त्याचा अभिनय वेगळा आहे आणि तो रसिकांना पसंती पडतो आहे .
![]() |
ayushyaman khurana & riya chakrvarti |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हळू हळू अनलॉक करत केंद्र व राज्य सरकारे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत . याच संदर्भात अनलॉक ५ ची घोषणा होताच काही खबरदारी घेत चित्रपटगृहे आणि हॉटेल ना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे तसेच चित्रपट सृष्टीतही लॉक डाऊनमुळे ज्या चित्रपटांचे चित्रीकरण थांबवले होते ते सुरु होत आहे . त्यामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरणास आता पुन्हा सुरुवात झाली आहे .
![]() |
ayushyman khurana |
त्यात आभिषेक कपूरचे दिग्दर्शन असणाऱ्या एका चित्रपटाचा समावेश आहे नाव निश्चित ना झालेल्या या चित्रपटात आयुष्मान खुराणा मुख्य भूमिकेत असून वाणी कपूर नायिकेचा रोल करणार आहे . चालू महिन्यातच १६ तारखेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे .चंदीगड व परिसरातच हे शूटिंग सुरु असून आयुष्यमान खुराणाचे हे होम टाऊन आहे . चित्रपटाचे शूटिंग संपवून डिसेंबर मध्ये हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे . तसे झाल्यास येत्या काळात लॉकडाउन नंतर लवकरच आपल्याला एक चांगला चित्रपट पाहायला मिळेल . लॉक डाऊन काळात प्रदर्शित झालेले चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित झाले त्यामुळे आता येणारे चित्रपट तरी चित्रपटगृहात प्रदर्शित होतात का ? हे पाहावे लागेल .
याच महिन्यात आणखीही काही बड्या चित्रपटांचे शूटिंग चालू होणार असल्याचे समजते त्यामध्ये अक्षय कुमारचा बेलबॉटम चे उर्वरीत शूटिंग लंडनमध्ये सुरु होणार आहे या सिनेमातही वाणी कपूर काम करत आहे . शाहिद कपूरच्याही जर्सी चे शुटिंग लवकरच चालू होणार आहे . सलमान खानच्या राधे या चित्रपटाचे पॅच वर्कला नुकतीच सुरुवात झाली असून हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे . येत्या काळात बरेच रखडलेले चित्रपट पूर्ण होणार असून दिवाळीनंतर प्रदर्शनासाठी या चित्रपटामध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येईल मात्र दर्शकांना वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी मिळेल
![]() |
ayushyaman khurana |