मराठा आरक्षणावर दि. २७ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झालीच नाही
सरकारचे वकील गैरहजर
सुप्रीम कोर्टाने सुनावणी चार आठवडे स्थगित केली .
![]() |
Supreme court |
या सुनावणीत काहीतरी ठोस निर्णय होईल, अशी मराठा समाज बांधवाना अपेक्षा होती. समाजातर्फे कोर्टात तश्या पद्धतीने आपली बाजू मंडळी होती, परंतु सरकार पक्षाचे वकील कोर्टात उशिरा आले त्यामुळे तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सदरची सुनावणी पुढे ढकलली आहे. चार आठवड्यासाठी सुनावणी पुढे ढकलल्यामुळे आधीच उशीर झालेल्या मराठा आरक्षण प्रकरणाला आणखी किमान एक महिना तरी उशीर होणार असल्याने आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा समाजाचा भ्रमनिरास झाला आहे . सादर सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाच्या वकिलांची वर्तणूक बेजबाबदारपणाची प्रतिक्रिया मराठा समाजातून उमटली आहे. सरकार पक्षाच्या वकिलांनी कोर्टात गैरहजर राहणे किंवा उशिरा येणे हे सरकारच्या उदासीनतेचे लक्षण आहे, असे मत मराठा आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही , "सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही म्हणूनच असे वेळकाढूपणा करत आहे . " असा आरोप सरकारवर केला आहे . '
दरम्यान नुकतीच ३० सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील विवेक रहाडे या तरुणाने आरक्षणाला उशीर होत असल्याच्या कारणाने आत्महत्या केली होती . या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करताना मराठा क्रांती मोर्च्याने मराठा तरुणांना आत्महत्या करू नका असे आवाहन केले आहे
मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये , मराठा क्रांती मोर्चा चे आवाहन ,लढा तीव्र करणार
![]() |
maratha kranti morcha |
मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये , मराठा आरक्षणाच्या चळवळींची तीव्रता वाढवली जाणार आहे . त्याचबरोबर सरकारने मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाबाबत ठाम विश्वास मिळवून देण्याची मागणी करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले . मराठा आरक्षणासाठी बीड जिल्याहातील विवेक रहाडे या तरुणाने 30 सप्टेंबरला आत्महत्या केली होती . त्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते .
आत्महत्या करून मराठा समाजाच्या चळवळींचे नुकसान करू नका , असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा महामुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केले आहे . राज्य व केंद्र सरकारविरोधातील लढाई हळूहळू तीव्र केली जात आहे . तोपर्यंत समाजातील कार्यकर्त्यानी धीर धरावा , असही ते म्हणाले . राज्य सरकारने दिरंगाई केलास मराठा क्रांती मोर्चाच्या तीव्र लढ्यास सामोरे जावे लागेल .