चित्रपट सृष्टी नशेच्या विळख्यात
 |
चित्रपट सृष्टी - नशेबाज कलाकार |
भारतामध्ये अनेक उदयोगांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि जिथे पैश्याचा महापूर वाहतो अशा उद्योगांमध्ये चित्रपट उद्योगाचे नाव समाविष्ट आहे . या उद्योगामध्ये पैसा आणि प्रसिद्धी मिळत असल्याने अनेक जण इथे आपले नशीब आजमावतात . तसेच आपल्या देशात जानमाणसावरही चित्रपटांचा आणि त्यातील कलाकाराचा भलताच प्रभाव आहे. चित्रपट कलाकारांना आदर्श मानणाऱ्यांची संख्या आपल्या देशात मोठी आहे . परंतु खाजगी आयुष्यात या कलाकारांचे वागणे खरेच आदर्श आहे का ? तर या प्रश्नाचे उत्तर 'अजिबात नाही' असेच आहे कारण चित्रपट सृष्टीला नशेचा विळखा पडला आहे . आणि हे आजच आहे असे नाही तर बॉलिवूड आणि नशेचे नाते फार जुने आहे .
मुळात बॉलिवूड आणि अंडर वर्ल्ड यांचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यामुळे चित्रपट कलाकारांचे नशा करणे हि काही नवलाईची बाब नाही परंतु जिथे आपल्या समाजात साधे दारू पिणार्यालाही असभ्य मानले जाते तिथे हे कलाकार मात्र दारू बरोबरच गांजा, अफिम, चरस, ब्राऊन शुगर असे, ज्या पदार्थाची नावेही सामान्य माणसाला माहित नसतील, अश्या अमली पदार्थाचे सेवन करतात . आजवर अनेक कलाकार ड्रग्जच्या आहारी गेल्याची उदाहरणे आपण पहिली आहेत यामध्ये चर्चेत आलेले पहिले नाव होते संजय दत्तचे त्यानंतर फरदीन खान, मनीषा कोईराला , आमिष पटेल अशी आणखी काही कलाकारांची नावेही आपण बातम्यातून ऐकली आहेत पण हि फक्त समोर आलेली नावे असून चित्रपट सृष्टीत अमली पदार्थ घेणारी बरीच मंडळी आहे हे उघड गुपित आहे. पोलीस , प्रशासन , आणि जबाबदार मंडीळीनी या सर्व प्रकाराकडे , अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचेही जाणवते. सुशांतच्या मृत्यूमेळे जर तपास यंत्रणे समोर हा नशीला धागा आला नसता तर चित्रपट सृष्टीतला हा नशेचा धुमाकूळ असाच बिनबोभाट चालू राहिला असता . चित्रपट क्षेत्राला लागलेल्या या भयंकर शापातून सध्यस्थित तरी कोणी वाचला असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण या प्रकरणी आणखी बरीच नवे उजेडात येणे बाकी आहे
अनेक कलाकार नशेबाज असल्याचा संशय
 |
bollywood & drugs |
अभिनेता सुशांतसिह राजपूतच्या आत्महत्येचा तपास करता करता बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांचे कनेक्शन चव्हाट्यावर आले . संपूर्ण देशभर त्याचे बरेच चर्वितचर्वण सुरु आहे . मात्र, सिनेकलाकार आणि ड्रग्जचा घरोबा नवा नाही , बॉलिवूडला , डॉन दाऊद इब्राहिम आणि ड्रग्ज यांची एकाच वेळी लागण झालेली आहे . बॉलिवूड, दाऊद आणि ड्रग्ज हे अभद्र साटेलोटे मागील जवळपास ४० वर्षांपासून अबाधित आहे . सुशांतसिहच्या मृत्यूने ते पुन्हा चव्हाट्यावर आले असून संपूर्ण बॉलिवूड संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे . आजवर अनेकदा चित्रपट कलाकारांची ड्रग्ज प्रकरणे समोर आली आहेत आणि त्या -त्या वेळी चांगलेच गाजले होते . बॉलिवुडच्या काही पार्ट्यामध्ये हाजी मस्तान च्या बंगल्यावर बॉलिवूड कलाकारांची हजेरी यांची रसभरीत वर्णने त्या काळात केवळ सिनेजगताला वाहून घेतलेल्या नियतकालिकांमध्ये छापून यायची आणि अनेकांच्या भुवया उंचावायच्या . त्या काळातील काही हिंदी चित्रपटांना हाजी मस्तानाने अर्थसहाय्य केल्याच्याही वार्ता कानी पडायच्या . पण कधी त्याची खोलात जाऊन शहानिशा होताना दिसत नव्हती . मुंबईच्या एकेकाळचे बेताज बादशहा करीमलाल आणि हाजी मस्तान यांचे बॉलिवुडमधील अनेक बड्या हस्तीशी असलेले जिव्हाळयाचे संबंध त्या -त्या वेळी चांगलेच गाजले होते . कालांतराने मुंबईच्या अंडरवल्डच्या करीमलाला आणि हाजी मस्तानची हुकूमत लयाला गेली आणि ८० च्या दशकात तिथे दाऊद इब्राहिमची वहिवाट निर्माण होत गेली .
दाऊद अन ड्रग्जची एकाचवेळी लागण !
 |
Dawood Ibrahim |
करीमलाला आणि हाजी मस्तान हे स्मगलर म्हणून जास्त परिचित होते . सोने -चांदी , परदेशी मौल्यवान वस्तू , घड्याळे यांच्याशीं त्यांची तस्करी निगडित होती . मात्र दाऊदचा दबदबा निर्माण झाल्यानंतर त्याने मुख्यतः अमली पदार्थाच्या तस्करीकडे मोर्चा वळविला . कालांतराने दाऊदने करीमलाला आणि हाजी मस्तानच्या पावलावर पावले टाकत बॉलिवुडमध्येही चंचुप्रवेश केला . अनेक बॉलिवुड तारे -तारका दाऊदच्या दरबारात हजेरी लावण्यात धन्यता मानू लागले . त्यांचे खुलेआम प्रदर्शन करू लागले . बॉलिवुडच्या काही तारकांचे तर थेट दाऊदशी नाव जोडले जाऊ लागले .,अनेक चित्रपट निर्माते ,दिगदर्शक आणि कलाकार या काळात अक्षरशः दाऊदच्या तालावर नाचताना दिसत . हळूहळू बॉलिवुड मध्ये दाऊदची थेट गुंतवणूक सुरु झाली . त्याचा इशाऱ्यानुसार बॉलिवुडमधील अनेक निर्णय घेतले जाऊ लागले .दाऊदच्या बॉलिवूडमधील या चंचुप्रवेशाच्या जोडीनेच ड्रग्जचाही शिरकाव झाला .त्यापूर्वी बॉलिवूड म्हणजे धुतल्या तांदळासारखे नव्हते . रंगरूप ,यश - अपयश ,शह -काटशहाच्या बॉलिवूडमधील खेळात नशेला स्थान नसते तरच नवल ! पण ही नशाबाजी मद्य आणि मदिराक्षीपर्यंत मर्यादित होती . पण बॉलिवूडमधील दाऊदचे प्रस्थ वाढत गेले , तसतसे बॉलिवूडच्या पार्ट्यामधील ड्रग्जची धुंदी चढत गेली बॉलिवूडची पार्टी आणि ड्रग्ज यांचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले . कालांतराने मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊदने देशातून पळ काढून पाकिस्तनात आश्रय घेतला . पण आपली बॉलिवूडशी असलेली नाळ त्याने आजतागायत तुटू दिलेली नाही आजही बॉलिवूडवर दाऊदचा दबदबा आणि वरदहस्त आहे . बॉलिवूडशी संबंधित अनेक निर्णय दाऊदच्या इशाऱ्यानुसार होतात . दाऊदला त्याची बिदागी हस्ते -परहस्ते पोहोच करणाऱ्यांची बॉलिवूडमध्ये कमी नाही. त्याचप्रमाणे बॉलिवूड आणि ड्रग्ज यांच्यामधील प्रमुख दुवा हे दाऊदचेच नेटवर्क आहे . हे नेटवर्क जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही, तोपर्यंत बॉलिवुडवरील ड्रग्जचा डाग धुतला जाणार नाही .
 |
bollywood and drugs |
बॉलिवूडच्या ड्रग्ज पार्ट्या दर्लक्षित !
बॉलिवूडमधील बहुतेक आघाडीचे कलाकार ,निर्माता ,दिगदर्शक व संबंधितांचे महाबळेश्वर ,पाचगणी , रायगड ,माथेरान ,लोणावळा ,खंडाळा ,कर्जत आदी ठिकाणी आलिशान फार्म हाऊस आहेत .विकेंडला किंवा कारणपरत्वे या फार्म हाऊसवर ड्रग्ज पार्ट्या रंगतात . कधीतरी कुठल्या तरी रेव्ह पार्टीवर छापा टाकून स्वतः ची पाठ थोपटून घेणाऱ्या पोलिसांना बॉलिवूडमधील या ड्रग्ज पार्ट्या दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते . बॉलिवूडचे राजकीय लागेबांधे आणि अर्थपूर्ण संबंध सारे काही निभावून नेतात .