दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
देऊळगाव राजा शहरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन मजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
मजूरीसाठी परराज्यातून व अमरावती जिल्ह्यातून आलेल्या महिला पिंपळगाव येथे कापूस वेचण्यासाठी मालवाहू पिकअप क्रमांक एमएच 38 ई 2082 मध्ये बसत होत्या. त्याचवेळी जाफराबाद–जालना मार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने (एमएच 20 बीएल 2276) पिकअपला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की मायाबाई सुरज काजले (जि. बुरहानपूर) आणि रिचा कासदेकर (जि. अमरावती) या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच महिला गंभीर जखमी आहेत.
देऊळगाव राजा परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक डॉक्टर अक्षय गुठे, चालक सुभाष कणखर आणि समाधान आघाव यांनी घटनास्थळावरून माहिती दिली आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














