ज्ञान मंदिरातील मुलांना संस्कार दिले
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सौ सुधा गायकवाड यांनी गेली 39 वर्ष अविरतपणे ग्रामीण भागातील ज्ञान मंदिरातील मुलांना जे संस्कार दिले आहेत ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत वाई पंचायत समिती गटविकासधिकारी विजयकुमार परीट यांनी व्यक्त केले
सौ सुधा आनंदराव गायकवाड पदवीधर शिक्षिका यांचा 39 वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत्ती होत असून त्यांचा सत्कार व सेवा गौरव समारंभ सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उडता रे तालुका वाई येथे घेण्यात आला त्यावेळी ते अध्यक्षस्थानी बोलत होते
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वाई हर्षवर्धन मोरे शिक्षण विस्ताराधिकारी पंचायत समिती वाई साईनाथ वाळेकर शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वाई शकील मोमीन शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वाई दिलीप बाबर केंद्रप्रमुख उडतारे गजानन वारागडे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत उडतारे चेअरमन व सर्व सदस्य विकास सेवा सोसायटी उडतारेचेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य नवलाई सहकारी पतसंस्था पाचवड सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ पाचवड अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती उडतारे उडतारे केंद्र समूह सर्व शिक्षक वृंद उडतारे व पाचवड परिसरातील सर्व ग्रामस्थ मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उडतारे आदी मान्यवर उपस्थित होते
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














