बुलढाणा येथे नॅशनल आयकॉन अवॉड 2025संपन्न झाला
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले कला व विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रेरणादायी व्याख्याते यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ माता रमाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राजश्री शाहू महाराज अशा महान महामानवाचे विचार व कार्य समाजात व विविध विद्यालय महाविद्यालयात आपल्या व्याख्यानातून करून समाज जागृती केली आहे तसेच गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आजारी व्यक्तींना आर्थिक मदत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना शिक्षक दिन व हिंदी मराठी राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार सोहळ्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खरचे प्राचार्य व्ही बी कोलते इंजीनियरिंग कॉलेज महाराष्ट्र प्रदेशाअध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघाच्या धनश्री ताई पाटील उद्योजक दामोदर शर्मा एडवोकेट सम्यक चौरे शेतकरी नेते विजयकुमार डांगा वाहतूक नियंत्रक डॉक्टर प्रदीप गायकी नांदुरा पिशोर चे माजी सरपंच पीएम डाहके एडी सी बँकेचे शाखा अधिकारी बळीराम मोकासे महात्मा फुले शिक्षक सोसायटीचे कर्मचारी साळूबा मोकासे राजू जाधव इत्यादी मान्यवर व अधिक संख्येने माता भगिनी व सत्कारमूर्ती उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














