ऊसतोड मजुरांच्या मुकादमांकडून महाराष्ट्रात अनेक फसवणुकीचे प्रकार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
ऊस तोडणीकरता मजूर पुरवतो असे सांगून मध्यप्रदेश येथील व्यक्तीने केजळ ता. वाई येथील एका शेतकऱ्याची तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
पोलिसानी दिलेली माहिती, सुनिता मधूकर ससाणे (वय 47, रा. केंजळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 8 ऑगस्ट 2023 ते दि. 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत कैलास पांडया पाडवी (वय 33, रा. मध्यप्रदेश) याने ऊस तोडणी व भरणी करण्यासाठी 12 पुरुष व 12 महिला मजूर पुरवतो असे सांगून 100 रुपयांच्या स्टॅम्पवर करार केला होता. त्यावेळी 70 हजार रुपये रोख दिले.
यानंतर फिर्यादीचे पती मधूकर ससाणे व नातेवाईक राजेंद्र ननावरे हे कैलासच्या घरी गेले असता त्याने 1 लाख रुपयांचा चेक दिला. पुढे दि. 30 सप्टेंबर रोजी 1 लाख 50 हजार रुपयांची एनईएफटी करण्यात आली. त्यानंतर कैलास पाडवी याने आणखी पैसे लागतील असे सांगून 50 हजार रुपये घेतले. अशा प्रकारे एकूण 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार सपकाळ करत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














