रस्त्याच्या कामात मागितली दोन लाखांची खंडणी
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
शिरुर शहरात सोनारआळी येथे रोडच्या कामासाठी मटेरियल टाकायला आलेल्या मिक्सर चालकाला तडीपार असलेल्या गुन्हेगाराने दमदाटी करत त्याच्या खिशातील पैसे काढून घेऊन दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी तडीपार गुंडावर गुन्हा दाखल करत शिरूर पोलिसांना अटक करण्यात यश आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
याबाबत संतोष तुकाराम वाखारे (वय ३२ रा. विठ्ठलनगर शिरुर ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक हनुमंत मिसाळ (वय २४ रा. सोनार आळी शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर शहरातील सोनार आळी येथे रस्त्याच्या सुरु असलेल्या कामासाठी संतोष वाखारे यांनी रोडच्या कामासाठी मटेरियल टाकायला मिक्सर वाहन पाठवले असताना पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेल्या शिरूर येथील अभिषेक मिसाळ याने या ठिकाणी येत वाहन अडवून वाहन चालकाला दमदाटी करत वाहनाच्या चाव्या काढून घेतल्या.
मी इथला भाई आहे काम चालू ठेवायचे असेल तर मला दोन लाख रुपये द्या,नाहीतर काम पण बंद होणार आणि तुमचे हातपाय सुद्धा तुटणार अशी धमकी देत वाहन चालक अमोल भोर याची खिशातील आठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतली. यावर आजचे काम चालू ठेवा उद्या पासून काम चालू ठेवायचे असेल तर दोन लाख रुपये द्या, नाहीतर हात पाय तोडून गोळ्या घालील, अशी धमकी देऊन अभिषेक निघून गेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके हे करत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














