जिल्हा परिषद केंद्र शाळा शिंदेवाडीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन - अध्यक्षपदी गणेश रणवरे, तर उपाध्यक्षपदी वैभव कुलकर्णी

पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय
School management committee formed, natepute, malshiras, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (राहुल तनपुरे)
जिल्हा परिषद केंद्र शाळा शिंदेवाडी येथे शाळा व्यवस्थापन समितीचा पुनर्गठन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. यावेळी नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी गणेश रणवरे, तर उपाध्यक्षपदी वैभव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

समितीच्या सदस्यपदी लतेश शिंदे, शक्तीकुमार मसुगडे आणि अनिल पवार, शिक्षण तज्ञ म्हणून नितीन मगर यांची निवड करण्यात आली. तसेच महिला सदस्यांमधून गौरी देशमुख, अनिता रणदिवे, सुप्रिया सरगर, प्रियंका सपकाळ, माधुरी सुळ, रयिसा सय्यद, कल्याणी रणदिवे, संगीता मदने, पूजा जगदाळे आणि पल्लवी ढोबळे यांची निवड करण्यात आली.

या पुनर्गठन प्रक्रियेत शाळेचे मुख्याध्यापक अशोक रूपनवर, शिक्षक महेंद्र काकडे, संतोष रुपनवर, रत्नदीप जानराव, संतोष धुमाळ, गायकवाड मॅडम व साळुंखे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवड प्रक्रिया आनंदी, उत्साही आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश रणवरे यांचा सन्मान माजी अध्यक्ष लतेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे उपस्थित मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र आहे. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी, शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. नवीन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला पालकवर्ग मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपस्थित होता. पालकांचा सक्रिय सहभाग, शिक्षकांचे सहकार्य आणि सर्वांच्या एकजुटीमुळे हा पुनर्गठन सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची एकजूट हीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खरी ताकद आहे, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !