वाईत शिवरायांच्या नूतन पुतळ्याचे दिमाखात अनावरण - फुले चौकात शिवभक्तांची मोठी उपस्थिती

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते सोहळा
Unveiling of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj, wai, minister makrand patil, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे) 
वाई शहरातील गणपती आळी येथील फुले चौक, दत्त मंदिर परिसरात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतन मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला शिवभक्तांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा, स्वाभिमान आणि मराठी अस्मितेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यासाठी गणपती आळीतील फुले चौक परिसरात जय्यत तयारी करण्यात आली होती. दसऱ्याच्या मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी, लोककल्याणकारी कार्य आणि स्वराज्याची प्रेरणादायी विचारधारा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतन मूर्तीच्या अनावरणानिमित्त नगरसेवक भारत खामकर, शैलेंद्र देवकुळे, अजित शिंदे, गुरुप्रसाद चव्हाण, नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, सचिन गायकवाड, रुपेश जाधव-भुसारी, सचिन शिंदे, परेश तळेकर, आकाश मोरे, विघ्नेश तळेकर, अक्षय खाडे, संतोष डांगिस्ते, सौरभ खोपडे, साहिल वखारकर तसेच शिवभक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

संघर्ष प्रतिष्ठान, बाल विठ्ठल मंडळ आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वाई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी सोहळ्यास उपस्थित मान्यवर, शिवभक्त आणि नागरिकांचे आभार मानले.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यामुळे वाईतील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवरायांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा जागर या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !