पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपा-महायुतीचा दमदार शंखनाद

डॉ.स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांचे शक्तिप्रदर्शनासह नामांकन दाखल
Teacher and graduate constitution election, BJP nomination, kaustubh gawade, dr. Smita jadhav, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पुणे (पारस मुथा)
पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपा-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आज उत्साहपूर्ण वातावरणात आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी भाजपा-महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीच्या प्रचाराचा प्रभावी श्रीगणेशा केला.

नामांकन अर्ज दाखल करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमित गोरखे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने तसेच युवा पदवीधरांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा संकल्प यावेळी भाजपा-महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. दोन्ही उमेदवारांच्या नामांकनावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

भाजपा-महायुतीच्या एकजुटीचे आणि संघटनशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या या शक्तिप्रदर्शनामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांत विजय मिळविण्यासाठी महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !