वृद्ध आजी भिंतीला टेकून हतबलपणे बसली
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
पारनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कारभाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रेशन धान्य मिळत नसल्याने एक अंध वृद्ध महिला आपल्या लहान बाळाला घेऊन थेट पुरवठा शाखेच्या दारातच जमिनीवर बसून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार आक्रमक होऊन पुरवठा अधिकारी यांना फोन द्वारे धारेवर धरत जाब विचारून घटनेची गंभीर दखल घेत पुरवठा विभागाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.
गरीब गरजू जनतेला न्याय देणाऱ्या तहसील कार्यालयातच जर अंध वृद्ध महिलेला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडले जात असेल तर प्रशासन करते तरी काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला..?
फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, वृद्ध आजी भिंतीला टेकून हतबलपणे बसली असून तिच्या मांडीवर एक लहान बाळ झोपले आहे. बाजूला लाल पिशवी आणि शासकीय टेबल आहे. कार्यालयात कर्मचारी असूनही तिची कोणीही दखल घेतली नाही.
शासन गरीबांना मोफत रेशन देत असल्याचा गाजावाजा करत असताना प्रत्यक्षात तळागाळातील लाभार्थ्यांना धान्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागत आहे. या अमानवीय प्रकाराला जबाबदार कोण? पुरवठा अधिकारी की मुजोर यंत्रणा?
या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गंभीर दखल घेऊन संबंधित महिलेला पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ धान्य मिळवून दिले असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच या बाबत मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पवार म्हणाले की घटना अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे संबंधित महिले बाबत पुरवठा विभागाला जाब विचारून महिलेला न्याय मिळवून दिला असला तरी याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या त्या गावातील स्वस्त धान्य दुकानदार यांचा संपूर्ण सात बारा लवकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाहेर काढून परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी आग्रही राहील
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























