आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आक्रमक मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर, (वैभव कुलकर्णी)
आरोग्य विभागातील अधिकारी कै. डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष विशेष तपास पथकामार्फत (SIT) सखोल चौकशी करण्यात यावी आणि सर्व दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केली आहे. यासंदर्भात जानकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश अबिटकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.
प्रमुख मागण्या:
SIT चौकशी व कठोर कारवाई: डॉ. रुपनवर आत्महत्या प्रकरणातील सर्व सत्य व डिजिटल पुरावे समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने स्वतंत्र 'SIT' गठीत करावी.
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला: पीडित रुपनवर कुटुंबाला जलद न्याय मिळावा यासाठी हा संपूर्ण खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवण्यात यावा.
१ कोटींची मदत व शासकीय नोकरी: दिवंगत डॉ. रुपनवर यांच्या वारसांना १ कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
कुटुंबाला पोलीस संरक्षण: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित कुटुंबाला तात्काळ पूर्ण पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.
हा लढा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून आरोग्य यंत्रणेतील अन्यायाविरुद्धचा लढा आहे. जोपर्यंत डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांना पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा आमदार उत्तमराव जानकर यांनी या वेळी दिला.
Dr. Rajendra rupnavar suicide case, demand of a SIT enquiry, MLA UttamRao jhankar, health minister Prakash Abitkar, malshiras, Solapur, shivshahi news,
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























