एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे नवीकरणीय ऊर्जा व पॉवर क्वालिटी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

विद्यार्थ्यांची एजीएम एनएसएल रिन्यूएबल पॉवरला औद्योगिक भेट
Sinhagad College student visit power project, AGM NSL Renewable Power Pvt. Ltd., pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने, आ य ई ई ई विद्यार्थी शाखा एस.के.एन.एस.सी.ओ.ई कोर्टी, पंढरपूर  (IEEE Student Branch, SKNSCOE Korti, Pandharpur) , तसेच त्याच्या  आय ई ई ई इंडस्ट्री ॲप्लिकेशन्स सोसायटी (IAS) स्टुडंट ब्रँच चॅप्टर आणि  आय ई ई ई वुमेन इन इंजिनिअरिंग (WIE) स्टुडंट ब्रँच चॅप्टर  यांच्या संयुक्त विद्यमाने  एजीएम एनएसएल रिन्यूएबल पॉवर प्रा. लि., विरळी , ता. माण, जि. सातारा (AGM NSL Renewable Power Pvt. Ltd.) येथे औद्योगिक भेटीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

सदर औद्योगिक भेट १७ सप्टेंबर २०२६ रोजी बी.टेक. विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. ही भेट पॉवर कॉलिटी  अँड फॅक्टस (PQ & FACTS) या विषयाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना औद्योगिक विद्युत प्रणालींचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.

या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, विद्युत ऊर्जा प्रणाली, पॉवर क्वालिटी तसेच फॅक्ट्स शी संबंधित पावर क्वालिटी हार्मोनिक इशूज आणि मिटीगेशन टेक्निक  याबाबत मौल्यवान माहिती व प्रत्यक्ष अनुभव प्राप्त केला. उद्योगातील तज्ज्ञांशी झालेल्या संवादातून विद्यार्थ्यांना विद्युत निर्मिती, विद्युत प्रसारण तसेच विश्वसनीय आणि गुणवत्तापूर्ण विद्युत पुरवठा राखताना येणाऱ्या विविध व्यावहारिक आव्हानांची माहिती मिळाली.

सदर औद्योगिक भेट प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि  उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. डॉ. के. शिवशंकर, एच ओ डी इलेक्ट्रिकल & आय ई ई ई स्टुडंट ब्रँच कौन्सिलर (HOD, IEEE Senior Member and IEEE Student Branch Counselor) यांनी या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

ही औद्योगिक भेट यशस्वीरित्या पार पडण्यासाठी  प्रा. अमोल एन. गोडसे (समन्वयक) , प्रा. किशोर जाधव, आय ई ई ई सदस्य व आयएएस ॲडव्हायझर (IEEE Student Branch Chapter IAS Adviser) , प्रा. सोनाली घोडके यांनी मोलाचे योगदान दिले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !