कन्नड येथील व्यावसायिक तथा साहित्य रसिक श्याम महाले यांचे निधन

कन्नड तालुक्यात हळहळ
Shyam mahale passed away , kannad, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, छ.संभाजीनगर (मनोज चव्हाण)
कन्नड - दै.शिवनातीर आणि मंगेश प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून कन्नड तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रभाकर (श्याम भाऊ) मनोहर महाले यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अत्यंत नम्र, मनमिळाऊ आणि आपुलकीचा स्वभाव हे श्याम भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. भेटताच नमस्कार करून प्रेमाने विचारपूस करणे आणि आपुलकीने संवाद साधणे, हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. त्यांच्या दुकानात कोणत्याही कामासाठी गेलेल्या व्यक्तीला काम झाल्यानंतर आवर्जून “चहा घेऊन जा,” असा आग्रह ते करत. त्यांच्या या छोट्याशा कृतीतूनही त्यांची मोठी माणुसकी आणि जिव्हाळा जाणवत असे.

कन्नडमधील मित्रांच्या समूहासोबत ते नियमित मॉर्निंग वॉकला जात असत. शक्य तेवढे पायी चालणे आणि आरोग्याची काळजी घेणे, याकडे त्यांचा कल होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

नेट कॅफे, झेरॉक्स, डी.टी.पी., लॅमिनेशन, प्रिंटिंग अशा विविध मल्टी-सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे कन्नड तालुक्यातील नागरिकांना सेवा दिली. सन २००४ पासून त्यांचा संपर्क वाढला. व्यवसायातील कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे त्यांनी मोठा जनसंग्रह निर्माण केला होता.

समाजकारण, राजकारण तसेच कन्नड तालुक्याच्या विकासाच्या विविध प्रश्नांवर श्याम भाऊंसोबत मनमोकळ्या गप्पा रंगत असत. तालुक्याच्या प्रश्नांविषयी त्यांना विशेष आस्था होती. त्यांची खरी ओळख केवळ व्यवसायिक म्हणून नव्हे, तर माणुसकी जपणारा आणि आपुलकीने नाती जपणारा व्यक्ती म्हणून होती.

लेखनाचीही त्यांना विशेष आवड होती. लेखकाच्या लेखनाला ते सातत्याने प्रोत्साहन देत. “आपण लिहित राहा, लेख पाठवत जा,” असा त्यांचा नेहमी आग्रह असे. एखादा लेख वाचल्यानंतर आवर्जून प्रतिक्रिया देऊन लेखनाला प्रोत्साहन देत असत. त्यांच्या या प्रोत्साहनातून अनेकदा नव्या उर्जेची जाणीव होत असे.

आज लेखणी हातात असताना “श्याम भाऊ, हा लेख वाचा...” असे म्हणून त्यांना लेख दाखवता येणार नाही, ही जाणीव मनाला चटका लावून जाते. त्यांच्या निधनाने केवळ एक मित्र गमावला नसून, आपुलकीने विचारपूस करणारा, प्रोत्साहन देणारा आणि माणुसकी जपणारा जवळचा आधार हरपला आहे.

श्याम भाऊंचा हसरा चेहरा, प्रेमाने केलेला नमस्कार, चहाचा आग्रह, मनमोकळ्या गप्पा आणि लेखनासाठी दिलेले प्रोत्साहन या आठवणी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही.
श्याम भाऊ महाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ.प्रकाश खेत्री 


-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !