सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला -१ नोव्हेंबरला मतदान तर ३ नोव्हेंबरला मतमोजणी

मोठ्या नेत्यांबरोबरच इच्छुकांची देखील लगबग
Satara DCC Bank election, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील आणि जिल्ह्याच्या राजकारणाची ‘धुरिणी’ मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे. बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. बँकेच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक होणार असून, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची यादी १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणूक कार्यालयात करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत
उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

१ नोव्हेंबरला मतदान
निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननी, माघार आणि अंतिम उमेदवार यादीपर्यंतच्या प्रक्रियेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल : २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६
उमेदवारी अर्जांची यादी : १ ऑक्टोबर २०२६
अर्जांची छाननी : ५ ऑक्टोबर २०२६
वैध अर्जांची यादी : ६ ऑक्टोबर २०२६, सकाळी ११ वाजता
उमेदवारी अर्ज माघार : ६ ते २१ ऑक्टोबर २०२६
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : २२ ऑक्टोबर २०२६
मतदान : १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ८ ते सायं. ५
मतमोजणी : ३ नोव्हेंबर २०२६
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !