धार्मिक स्थळांचे पावित्र्य भंग करणे आले अंगलट
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सार्वजनिक आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या ठिकाणी मद्यपान करून उच्छाद मांडणाऱ्या हुल्लडबाजांवर वाई पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गणपती घाट व परिसरातील पवित्र स्थळांचे पावित्र्य भंग करत हुल्लडबाजी करणाऱ्या तब्बल १२ मद्यपींना पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांची थेट पोलीस ठाण्यात वरात काढली.
वाई शहरातील मंदिराच्या पाठीमागे दारु पिवुन दारुच्या बाटल्या फोडुन भाविकांना त्रास देणारे, पसरणी घाटातील कट्ट्यांवर बसुन सार्वजनिक ठिकाणी दारु पिवुन त्याच ठिकाणी कचरा टाकणारे, तसेच कृष्णा नदीच्या तिरावरील घाट अशा पवित्र स्थळावर, स्मशानभुमिजवळ दारु पिवुन दारुच्या बाटल्या फोडुन शिवीगाळ करणारे मद्यपान करणाऱ्या लोकांमुळे वाई शहरातील विविध ठिकाणांतील भाविकांना, नागरीकांना होणाऱ्या त्रासाला व मनस्तापाला दुर करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी वाई व पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व ठिकाणावरील मद्यपान करुन त्रास देणाऱ्या इसमांचा एकत्रात बंदोबस्त करण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेतली व त्यानुसार वाई शहरात वाई पोलीस ठाणेतील चार विशेष पथके आवश्यक त्या सरंजामासह गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड, विविध ठिकाणांवरील स्मशानभुमी अशा वाई शहरातील महत्वाचे ठिकाणी एकाच वेळी कारवाई करणेकामी रवाना केली. मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे पालन करुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांनी पोलीस स्टाफसह वाई शहरातील गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड, विविध ठिकाणांवरील स्मशानभुमी अशा वाई शहरातील महत्वाचे ठिकाणी एकाच वेळी छापा टाकुन दारु पिवुन नागरीकांना त्रास देणाऱ्या १२ इसमांना, शिवीगाळ करणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले. सदर मद्यपान करणाऱ्या १२ इसमांना तात्काळ पोलीस ठाणेत आणुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वर रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमा अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग सुनील साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पो.कॉ. धीरज भोसले, पो.कॉ. उमेश लोखंडे, पो.कॉ. प्रसाद दुदूस्कर, पो.कॉ. राम कोळी, पो.कॉ. गोरख दाभाडे, पो. कॉ विक्रम धोत्रे, पो.कॉ नितीन कदम, पो.कॉ हेमंत शिंदे, पो.कॉ विशाल शिंदे, होमगार्ड अभिजीत येवले यांच्या पथकाने केली आहे.
या कारवाईमुळे परिसरात हुल्लडबाजांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या या धाडसी व धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























