शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर - संपूर्ण शिंदेवाडी व माळशिरस परिसरात हळहळ
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
शिंदेवाडी (ता. माळशिरस) येथील माजी सरपंच श्री. चंद्रकांत नारायणराव शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती मीनाक्षी नारायणराव शिंदे यांचे १ सप्टेंबर रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण शिंदेवाडी व माळशिरस परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीमती मीनाक्षी शिंदे (काकी) या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीच्या व्यक्तिमत्त्व होत्या. अध्यात्माची विशेष आवड असलेल्या मीनाक्षीताईंनी आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कारांची शिकवण दिली. शिंदे कुटुंबीयांचा सामाजिक व कौटुंबिक जिव्हाळा संपूर्ण परिसरात सुपरिचित असून, गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कुटुंब म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या जाण्याने शिंदेवाडी परिसराने एक ज्येष्ठ, मार्गदर्शक आणि वात्सल्यमूर्ती गमावली आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिंदे परिवाराचे सांत्वन करण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व आप्तेष्टांनी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला. त्यांच्या पश्चात माजी सरपंच श्री. चंद्रकांत नारायणराव शिंदे, इतर मुले, सुना, नातवंडे व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
दशक्रिया विधी: श्रीमती मीनाक्षी नारायण शिंदे यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी चंद्रभागा घाट, पंढरपूर येथे पार पडणार आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























