उपसभापती प्रमोद देशमुख आणि आमदार समाधान आवताडे यांच्याकडून ड्रेनेज लाईनसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी मंजूर
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विश्वकर्मा गुमास्ता सोसायटीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तीमय व उत्साही वातावरणात पार पडला. या उत्सवानिमित्त भजन, कीर्तन, प्रवचन यांसह विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्री चक्रीनाथ महाराज यांनी आपल्या प्रवचनात भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे महत्त्व विशद केले. "मानवाने मांसाहार आणि व्यसन टाळल्यास मानवी जीवन अत्यंत सुंदर आणि समृद्ध होईल," असा मोलाचा उपदेश त्यांनी या वेळी उपस्थित भाविकांना दिला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रमोदजी देशमुख आणि ग्रामपंचायत सदस्य दाजी आप्पा देशमुख यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन, अभिषेक व आरती करण्यात आली. या प्रसंगी बोलताना उपसभापती प्रमोद देशमुख यांनी सोसायटीतील अंतर्गत ड्रेनेज लाईनसाठी १० लाख रुपये मंजूर झाल्याची घोषणा केली व हे काम लवकरच सुरू होईल असे आश्वासन दिले. तसेच, सुधीर थिटे यांनी माहिती दिली की, आमदार समाधान अवताडे यांच्या माध्यमातून तीन शिवेवरील मारुती मंदिर परिसर ते विश्वकर्मा गुमास्ता सोसायटीपर्यंतच्या मुख्य ड्रेनेज लाईनच्या पहिल्या टप्प्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपसभापती प्रमोदजी देशमुख यांचा सत्कार प्रकाश अण्णा जोशी गुरुजी यांच्या हस्ते, ग्रामपंचायत सदस्य दाजीप्पा देशमुख यांचा सत्कार ज्येष्ठ सभासद भारत काका राऊत, जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल अजय पवार यांचा सत्कार प्रमोद देशमुख यांच्या हस्ते, तर महावितरणमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल दत्तात्रय डांगे यांचा सत्कार संदीप मिसाळ यांनी केला.
सत्कार समारंभानंतर उपस्थित भाविकांना शाबू खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. मध्यरात्री नामस्मरण आणि श्रीकृष्ण जन्मोत्सोवानंतर बाल गोविंदा पथकाने मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडली. पांडुरंग बोडके यांच्या हस्ते बाल गोविंदांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांना मसाले दूध वाटप करण्यात आले.
या उत्सवासाठी मारुती मंदिर परिसर, राजेंद्र नगर सोसायटी, सिटीजन पार्क सोसायटी आणि विश्वकर्मा गुमास्ता सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप भैय्या पालसांडे, सुधीर थिटे, प्रसाद जोशी गुरुजी, संदीप मिसाळ, पांडुरंग बोडके, सचिन आदापुरे, नवनाथ मोहोळकर, सचिन पालसांडे, प्रसाद कांबळे, संजय धोकटे, संतोष कवठेकर, नागेश मालगुंडे, आदित्य आदापुरे, बबलू रोकडे, प्रसन्न संगीतराव, सागर अन्नदाते, रोहित राऊत, गणेश भोसले, अजय पवार आणि विशाल रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच महिला मंडळातून राणी पालसांडे, पूजा बोडके, अश्विनी मिसाळ, प्रतीक्षा संगीतराव, आशा कांबळे, दर्शना अन्नदाते, स्नेहल कदम, पूजा अस्वले, पूजा कांबळे, दिव्या पवार, शितल पालसांडे, सौ. ढोबळे व अर्चना थिटे आदींनी मोलाचे योगदान दिले. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक सलोखा आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा































