स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस, (वैभव कुलकर्णी)
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणींपासून प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, अभ्यास साहित्य, करिअर मार्गदर्शन अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने मा. श्री. ॲड. राहुल (दादा) वाघमोडे पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा उपक्रम हाती घेतला आहे.
“शिक्षण हेच खरे सामर्थ्य... शिक्षित व्हा, प्रगती करा” या विचारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
शैक्षणिक फी भरणे, फी माफी व शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, महाविद्यालयाची निवड, हॉस्टेल व राहण्याची सोय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. त्याचबरोबर अभ्यास साहित्याची कमतरता, पुस्तके व नोट्स मिळणे, ऑनलाइन फॉर्म व अर्ज, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, ट्युशन व विशेष मार्गदर्शन यांसारख्या अडचणींवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच वर्गातील गैरहजेरी, शैक्षणिक अडचणी, मानसिक ताण व समुपदेशन तसेच इतर कोणत्याही शैक्षणिक समस्यांसाठीही संपर्क साधता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
“विद्यार्थ्यांची प्रगती, हाच आपल्या माळशिरसच्या विकासाचा पाया!” या भूमिकेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास किंवा योग्य मार्गदर्शनाची गरज भासत असल्यास डायरेक्ट राहुल दादांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ७७१५०३९९३३
“शिक्षणासाठी मदत योग्य मार्गदर्शन अडचणींचे निरसन भविष्याची दिशा” या उद्देशाने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचा आधार ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































